मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी लाॅबींग सुरू

आयुक्तपदी वर्णी लागण्यासाठी बड्याअधिकाऱ्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असून पोलिस दलात त्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी लाॅबींग सुरू
SHARES

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे हे फेब्रुवारीत निवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी अनेक दिग्गज रांगेत आहेत. आयुक्तपदी वर्णी लागण्यासाठी बड्याअधिकाऱ्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असून पोलिस दलात त्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आयुक्तपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा ः-DHFL चे कपिल वाधवान रुग्णालयात, तर विकासक सुधाकर शेट्टींच्या घरावर ईडीचे छापे


अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे संजय बर्वे  हे वयोमर्यादेनुसार ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यावेळी त्यांना ३ महिने मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत होती. मात्र दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले. ऐन निवडणूकीत नव्या आयुक्तांना मुंबईतली परिस्थिती हाताळणे जड जाऊ शकते. त्यामुळेच पून्हा बर्वे यांना ३ महिन्यांची मुदत वाढ दिली. फेब्रुवारी महिन्यात बर्वेंना देण्यात आलेली मुदतवाढ संपली आहे. त्यामुळे आयुक्तपदासाठी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांच्या सहमतीनंतर मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार हे ठरणार आहे. त्यामुळे शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे कोणत्या अधिकाऱ्यावर एकमत होते, हे पाहणं पाहावं लागेल.

हेही वाचाः- अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पूर्ण

या महत्वाच्या पदासाठी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग, ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, पुणे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम, सदानंद दाते, रश्मी शुक्ल यांची नावंही चर्चेत आहेत. मात्र नाव जरी चर्चेत असली. तरी सध्याच्या सरकारचे  प्रशासकीय निर्णय आणि राजकीय धोरण हे शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार ठरत आहेत.  राज्याचा कारभार सुकर करण्यासाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सल्ला शरद पवार यांना विश्वासात घेऊनच केला जात आहे.  त्यामुळे नव्या पोलिस आयुक्त पदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

हेही वाचाः- हँकॉक पुलाच्या बांधकामाच्या खर्चात वाढ

मुंबई पोलिस आयुक्तपदी १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे हे अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जायचे. बर्वे  यांनी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख ही होते.  आयुक्त पदासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालघर पोटनिवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा अचूक अहवाल सादर करत बर्वे यांनी मुख्यमंत्र्यांचं मन जिंकलं. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अशी बर्वे यांची ओळख आहे.


संबंधित विषय