Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

हँकॉक पुलाच्या बांधकामाच्या खर्चात वाढ

लोखंडी गर्डरचं वाढलेलं वजन आणि पायाभरणीसाठी अतिरिक्त कामामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याआधीच हँकॉक पुलाचा (Hancock Bridge) खर्च तब्बल २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढला आहे.

हँकॉक पुलाच्या बांधकामाच्या खर्चात वाढ
SHARES

मध्य रेल्वेच्या (Central Railway) सॅण्डहर्स्ट रोड (Sandhurt Road) स्थानकाजवळील हँकॉक ब्रिज (Hancock Bridge) धोकादायक ठरवण्यात आला. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये मध्य रेल्वेनं हा पूल पाडला असून, मागील ३ वर्षापासून या पूलाच्या कामाला वेग आलेला नाही. मात्र, आता या पुलाचं बांधकाम लवकरच करण्यात येणार आहे. परंतु, या बांधकामासाठी खर्चात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. लोखंडी गर्डरचं वाढलेलं वजन आणि पायाभरणीसाठी अतिरिक्त कामामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याआधीच हँकॉक पुलाचा (Hancock Bridge) खर्च तब्बल २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढला आहे. 

विविध करांसह ५१ कोटी रुपयांच्या या पुलाचा कामाचा खर्च आता ७७ कोटींवर गेला आहे. मुंबईतील माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यान असलेला हँकॉक पूल (Hancock Bridge) धोकादायक ठरल्यानं रेल्वेच्या (Railway) वतीनं तो पाडण्यात आला. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेनं (BMC) कंत्राटदाराची (Contractor) नियुक्ती करण्यात आली. मात्र, हा कंत्राटदार रस्ते घोटाळ्याच्या काळ्या यादीतील असल्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले.

महापालिकेनं पुन्हा फेब्रुवारी २०१८ मध्ये नव्याने निविदा (Tender) मागवून १९ महिन्यांत काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची (Sai Projects (Mumbai) Private Limited Company) निवड केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं.

महापालिकेकडून (BMC) नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राट कामांमध्ये लोखंडी गर्डर्सचं एकूण वजन ६६० मेट्रिक टन इतकं होतं. रेल्वे प्राधिकरणानं (Railway authority) आयआयटीच्या मार्गदर्शक तत्त्वातील आयएएस कोडप्रमाणे गर्डर्सचं डिझाइन बदलण्याची सूचना केली. त्यानुसार, गर्डर्सचे वजन वाढवून ते ६६० ऐवजी १३७४ मेट्रिक टन एवढं करण्यात आलं. त्यामुळं २० कोटी ७६ लाखांनी खर्च वाढला. त्याचप्रमाणं क्राँक्रिट खोदकामाची खोली १-डी ऐवजी ३-डी करण्यात आली आहे. त्यामुळं हीसुद्धा १० मीटरनं वाढली असून, खर्चात वाढ झाली आहे. एमएस लाइनर्स आणि काँक्रिट पाइल कॅपचा आकार वाढल्यानं विविध करांसह २५ कोटी ७१ लाख रुपयांनी हा खर्च वाढला आहे.

हॅंकॉक पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक सल्लागार एस. एन. भोबे अँड असोसिएट्स, तर फेरतपासणीसाठी आयआयटी, मुंबईची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक सल्लागाराला ६१ लाख ६८ हजार रुपये आणि फेरतपासणीसाठी १० लाख रुपये सल्लागार शुल्क देण्यात येणार होते. मात्र, वाढलेल्या कामांमुळे तांत्रिक सल्लागाराला २८ लाख २४ हजारांचे शुल्क वाढवून देण्यात येणार आहे.हेही वाचा -

१० फेब्रुवारीपर्यंत 'आयडॉल'च्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणारRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा