DHFL चे कपिल वाधवान रुग्णालयात, तर विकासक सुधाकर शेट्टींच्या घरावर ईडीचे छापे

वाधवान यांना उच्चरक्तदाब आणि खोकला सुरू झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी)ने विकासक सुधाकर शेट्टी यांचे घर तसेच कार्यालयावर छापे टाकले आहेत.

DHFL चे कपिल वाधवान रुग्णालयात, तर विकासक सुधाकर शेट्टींच्या घरावर ईडीचे छापे
SHARES

कुख्यात तस्कर इक्बाल मिरची याच्या मालमत्तेची खरेदी करणाऱ्या ‘दिवाण हौसिंग फायनान्स’चे (डीएचएफएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना गुरूवारी रात्री जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. वाधवान यांना उच्चरक्तदाब आणि खोकला सुरू झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी)ने विकासक सुधाकर शेट्टी यांचे घर तसेच कार्यालयावर छापे टाकले आहेत.

हेही वाचाः-मुंबईतील किमान तापमानात दुसऱ्यांदा घट

सिजय हाऊस ही १५ मजली मिर्ची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी संयुक्तरित्या २००७ मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील दोन फ्लँट मिर्चीच्या कुटुंबियांच्या नावावर २००७ मध्ये करण्यात आले आहेत. त्या शिवाय मेमर्स व्हाईट वाटर लि.च्या नावाने खंडाळ्यात सहा एकर जमीन देखील खरेदी करण्यात आली आहे.त्याचा ताबा मिर्चीच्यी दोन मुलांकडे आहे. त्याच बरोबर साहिल नावाचा बंगला त्याची पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे. तर वरळीतील समंदर महल येथील मालमत्ता मेव्हणा आणि बहिणीच्या नावावर आहे. त्या व्यतिरिक्त भायखळा येथील रोशन हाऊस चिञपटगृह, क्राफर्ड मार्केचमध्ये तीन गाळे, जुहू तारारोडवरील मिनाज हाँटेल, पाचगणी येथे बंगला अशा ५०० कोटींच्या मालमत्तांवर ईडीची नजर होती.

हेही वाचाः- इंद्रायणी एक्स्प्रेसचा प्रवास होणार आणखी सुरक्षित

इकबाल मिर्चीचं फरार असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झालं. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडेसहा लाखांना विकत घेतल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये कपिल वाधवान आणि त्यांचे बंधुशी संबधित कंपनी 'सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. जवळपास २०० कोटीपेक्षा अधिक किंमतीला ही मालमत्ता विकली असून यातून आलेला पैसा ‘टेरर फंड’ म्हणून वापरण्यात आला असल्याची दाट शक्यता तपास यंत्रणांनी वर्तविली आहे. याबाबत ईडीने कपिल वाधवान यांच्याकडे चौकशी केली. माञ वाधवान यांच्याकडून चौकशीस असहकार्य केल्यामुळे ईडीने अखेर त्यांना अटक केली. वाधवान यांच्या हजारो कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारातील काही बनावट आर्थिक नोंदीबाबत सुधाकर शेट्टी यांच्या कंपनीचा संबंध असल्याचे आढळल्याने हे छापे टाकण्यात आल्याचे सक्तवसुली महासंचालनालयाने स्पष्ट केले.

हेही वाचाः- अल्पवयीन मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

शेट्टी यांच्या घरी तसेच सहाना ग्रुप ऑफ कंपनीच्या वरळीतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपशील देण्यास नकार देण्यात आला. महासंचालनालयाकडून सध्या वाधवान यांची चौकशी सुरू आहे. वाधवान यांना वैद्यकीय तपासणीसाठी गुरुवारी जे. जे. इस्पितळात नेण्यात आले होते. ‘डीएचएफएल’च्या कर्जविषयक पुस्तकात एक लाख कोटी रकमेचा उल्लेख आहे. त्यापैकी २० हजार कोटी रुपयांचा स्रोत कळत नसल्याचे लेखा अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय १२ हजार ७७३ कोटी रुपयांचाही हिशोब लागत नसून, त्यापैकी काही रक्कम इक्बाल मिरचीच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा सक्तवसुली महासंचालनालयाला संशय आहे.

हेही वाचाः- भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

पाच बनावट कंपन्यांनाही तब्बल दोन हजार १८६ कोटी रुपये वळते करण्यात आले होते. या पाचही कंपन्यांवर कपिल व त्यांचे बंधू धीरज वाधवान हे संचालक आहेत. यातूनच काही संशयास्पद बाबी हाती लागल्याने त्याची अधिक चौकशी करण्यासाठीच शेट्टी यांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा