Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे (bhima koregaon violence) भाजप (bjp) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (rss) हात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे ​गृहमंत्री अनिल देशमुख​​​ (home minister anil deshmukh) यांनी केला.

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप
SHARES

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे (bhima koregaon violence) भाजप (bjp) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (rss) हात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

हेही वाचा- ‘एल्गार’ प्रकरणाची सुनावणी मुंबईत करा, ‘एनआयए’ची न्यायालयाकडे मागणी

महाराष्ट्र शासनाला विश्वासात न घेता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास अचानकपणे ‘एनआयए’(NIA)कडे सोपवला. सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि याआधी महाराष्ट्रातही भाजपचीच सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्र शासन भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा (bhima koregaon violence) ‘एसआयटी’मार्फत (SIT) नव्याने तपास करेल आणि या तपासात हिंसाचाराशी संबंध असलेल्या भाजपच्या जवळच्या लोकांवर कारवाई होईल, अशी भीती भाजपला वाटत असल्यानेच त्यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला, असं गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) म्हणाले.

या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालं आहे. त्यावर कायदेशीर सल्ला घेऊन तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याशी बोलून एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असंही देशमुख यांनी सांगितलं. 

हेही वाचा- केंद्राच्या एनआयए संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ – गृहमंत्री

त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे (NIA) न सोपवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याचा भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (bjp mla sudhir mungantiwar) यांनी दिलेला इशारा हास्यास्पद आहे. त्यांच्या विधानावरून या हिंसाचार प्रकरणाचा एसआयटीकडून तपास झाल्यास भाजप नेते अडचणीत येऊ शकतात, असंच त्यांनाही वाटत असल्याचं दिसून येत आहे, असंही देशमुख म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा