Advertisement

इंद्रायणी एक्स्प्रेसचा प्रवास होणार आणखी सुरक्षित

मुंबई-पुणे मार्गावर इंद्रायणी एक्स्प्रेसनं (Indrayani Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

इंद्रायणी एक्स्प्रेसचा प्रवास होणार आणखी सुरक्षित
SHARES

मुंबई-पुणे मार्गावर इंद्रायणी एक्स्प्रेसनं (Indrayani Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता इंद्रायणी एक्स्प्रेसचा (Indrayani Express) प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. शनिवारपासून मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसला अपघातरोधक (LHB) डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं (Central Railway) घेतला आहे. या गाडीला राजधानीच्या धर्तीवरील डबे जोडण्यात येणार असल्यानं तिचा वेग वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन (Deccan Queen) आणि मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur) प्रवाशांच्या पसंतीच्या उद्यान-सिद्धेश्वर एक्स्प्रेस 'एलएचबी'मध्ये धावत आहेत. प्रशस्त जागा, वजनाने हलके, वेगवान प्रवासाची क्षमता ही अपघातरोधक डब्यांची वैशिष्ट्ये आहेत. मध्य रेल्वेकडून (Central Railway) यंदाच्या आर्थिक वर्षासाठी (Financial Year) (२०१९-२०२०) एकूण १९ मेल-एक्स्प्रेसला असे डबे जोडण्यात येणार आहेत. यापैकी १० मेल-एक्स्प्रेसचं काम पूर्ण झाल्याची माहिती मिळते. उर्वरित काम आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

हेही वाचा - भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

आंतरशहरी प्रवासातील अंतर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी मेल-एक्स्प्रेसचा वेग वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. पहिल्या टप्प्यात आयसीएफ (ICF) डब्यात धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचे रूपांतर एलएचबी (LHB) डब्यांमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - ‘एल्गार’ प्रकरणाची सुनावणी मुंबईत करा, ‘एनआयए’ची न्यायालयाकडे मागणी

'मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसला (Mumbai-Pune Indrayani Express) अपघातरोधक डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ चेअर कार, २ वातानुकूलित चेअर कार, २ जनरेटर डबे यांच्या अपघातरोधकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस शनिवार १ फेब्रुवारीपासून नव्या रूपात धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

रस्त्यावर खड्डे आढळल्यास कंत्राटदार जबाबदार- महापालिका

अल्पवयीन मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा