Advertisement

रस्त्यावर खड्डे आढळल्यास कंत्राटदार जबाबदार- महापालिका

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात व महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठते. त्यामुळं प्रशासनानं कंत्राटदारांवरच जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्त्यावर खड्डे आढळल्यास कंत्राटदार जबाबदार- महापालिका
SHARES

मुंबईतील रस्त्यांची अनेकदा दुरूस्ती करण्यात येते. मात्र, पावसाळ्यात पुन्हा या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे (Pits) पडतात. या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अपघात (Accidents) होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळं या परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेनं (BMC) 'ज्या रस्त्यांच्या दर्जाची हमी दिली आहे, अशा रस्त्यांवर खड्डे दिसल्यास संबंधित कंत्राटदाराला (Contractor) जबाबदार धरण्यात येणार आहे. त्याशिवाय त्याची अनामत रक्कम तसंच, केलेल्या कामाचा मोबदलाही रोखण्यात येणार आहे’, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनानं दिला आहे. 

महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर किती कंत्राटदार (Contractor) दर्जेदार रस्ते बनवणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. पावसाळ्यात (Rain) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात व महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठते. त्यामुळं प्रशासनानं कंत्राटदारांवरच जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिमेंट काँक्रिट रस्त्याचा (Cement Concrete Road) हमी कालावधी ५ वरून १० वर्षे, तर डांबरी रस्त्याचा हमी कालावधी ३ वरून ५ वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हमी कालावधी संपेपर्यंत कंत्राटातील २० टक्के रक्कम रोखून धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हमी कालावधीत रस्त्यावर खड्डे पडले तर कंत्राटदारालाच ते बुजवावे लागणार आहेत.

गुरूवारी स्थायी समितीची बैठकी (Standing Committee Meeting) पार पडली. या बैठकीत खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल (Additional Commissioner Vijay Singhal) यांनी हमी कालावधीत रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांबाबत कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याचं स्पष्ट केलं.

मुंबईतील हमी कालावधी असलेल्या रस्त्यांची पाहणी केली असून, जेथे खड्डे दिसून आले ते तातडीनं बुजवण्याचं आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रस्त्याबरोबरच रस्त्याच्या कडेचे पट्टे व फूटपाथही सुस्थितीत ठेवण्याचं बंधन कंत्राटदारांना घालण्यात आलं आहे. हमी कालावधीत रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची तसेच रस्त्यावर अधिकृत अथवा अनधिकृत खोदकाम झाल्यास त्याचीही माहिती कंत्राटदारानं देणं आवश्यक आहे.



हेही वाचा -

मुंबईतील किमान तापमानात दुसऱ्यांदा घट

राणी बागेत पाहायला मिळणार भारतातील पहिली ट्राम



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा