Advertisement

राणी बागेत पाहायला मिळणार भारतातील पहिली ट्राम

मुंबईची ओळख असणाऱ्या वास्तू एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

राणी बागेत पाहायला मिळणार भारतातील पहिली ट्राम
SHARES

मुंबईची ओळख असणाऱ्या वास्तू एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. 'म्हातारीचा बूट', 'भारतातील पहिली ट्राम', 'गेट वे ऑफ इंडिया', 'कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी' याप्रमाणे अनेक वास्तू मुंबईकरांना महापालिकेच्या (BMC) वार्षिक उद्यान प्रदर्शनात (Annual garden Exhibition) पाहायला मिळणार आहे. भायखळा (Byculla) येथील राणीच्या बागेत (Rani baug) मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

महापालिके द्वारे आजोजित करण्यात येणारे ३ दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन यंदा आपला रौप्य महोत्सव (Silver jubilee) साजरा करीत आहे. यंदाच्या २५ व्या वार्षिक उद्यान प्रदर्शनाचं (Annual garden Exhibition) औचित्य लक्षात घेऊन प्रदर्शनात एकंदरीत २५ हजार रोपटी असणार आहेत. त्याचबरोबर गेटवे आॅफ इंडिया, म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्राम, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, चित्रनगरीचे प्रतीक असणारा कॅमेरा अशा मुंबईची ओळख असलेल्या विविध मानबिंदूंच्या प्रतिकृती व सेल्फी पॉइंट असणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या (BMC) उद्यान खात्याचं कामगार, कर्मचारी, अधिकारी यासाठी अक्षरश: दिवसरात्र काम करीत आहेत. या रौप्य महोत्सवी (Silver jubilee) प्रदर्शनाला अधिकाधिक मुंबईकरांनी भेट द्यावी, असं आवाहन यानिमित्तानं महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केलं आहे. 

या प्रदर्शनाचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai  Mayor Kishori Pednekar) यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. प्रदर्शनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ३५ गटांमध्ये उद्यानविषयक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जास्तीतजास्त झाडं लावणं व त्यांचं संवर्धन करणं, उद्यानांची देखभाल, वाहतूक बेट व दुभाजकांचे परिरक्षण, सोसायटी स्तरावरील रुफ टॉप/टेरेस उद्यान, उद्यान कचऱ्यापासून खतनिर्मिती यांसारख्या विविध गटांचा समावेश आहे.

प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडं, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरश: शेकडो प्रकार मुंबईकरांना पाहायला मिळणार आहेत. मुंबई परिसरात अत्यंत दुर्मीळ असणाऱ्या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मीळ देशी प्रजातींची झाडे बघता येणार आहेत. परदेशी भाज्यांची रोपे वा झाडे बघण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत तर १ व २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.



हेही वाचा -

मुंबईतील किमान तापमानात दुसऱ्यांदा घट

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा