Advertisement

मुंबईतील किमान तापमानात दुसऱ्यांदा घट

मुंबईकरांनी गुरूवारी संध्याकाळी गार वाऱ्यांचा (Cold) अनुभव घेतला.

मुंबईतील किमान तापमानात दुसऱ्यांदा घट
SHARES

मुंबईकरांनी गुरूवारी संध्याकाळी गार वाऱ्यांचा (Cold) अनुभव घेतला. गुरूवारी सकाळी मुंबईतील तापमानात (Temperature) मोठी घट झाली होती. मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz) इथं किमान तापमानाचा (Minimum Temperature) पारा १३.६ अंशांपर्यंत खाली उतरला होता. तसंच, कुलाबा (Colaba) इथं किमान तापमान १६ अंश सेल्सिअस होतं. मुंबईतील सर्वात कमी किमान तापमान बोरिवली (Boriwali) पूर्व इथं १०.९६ अंश सेल्सिअस होतं. त्यामुळं गुरुवारी मुंबईकरांनी दुसऱ्यांना यंदाच्या मोसमातील सर्वात कमी किमान तापमानाचा अनुभव घेतला.

गारठा (Cold) वाढल्यानं मुंबईकरांना गरम कपडे घालणं पसंत केलं आहे. गुरुवारीही बुधवारप्रमाणंच मुंबईत दिवसभर गार वारे होते. वाऱ्यांमुळं तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा कमी जाणवल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागानं (Regional Meteorological Department) दिली. बुधवारपेक्षा गुरुवारी कमाल तापमान अधिक असून, गुरुवारी कुलाबा इथं २८ तर सांताक्रूझ इथं २८.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं.

जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील १७ जानेवारी रोजी सांताक्रूझ इथं किमान तापमान (Minimum Temperature) ११.४ अंशांपर्यंत खाली उतरलं होतं. त्यावेळी मुंबईच्या काही उपनगरांमध्ये किमान तापमान १० अंशांखाली पोहोचलं होतं. मात्र, गुरुवारी मुंबईतील सर्वात कमी किमान तापमान हे १० अंशांच्या वर होतं. गुरुवारी पवई इथं १२.५ तर गोरेगाव इथं १२.४ अंश सेल्सिअस तापमान होतं. पनवेल इथं ११.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं आहे.

मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, भांडुप पश्चिम, सांताक्रूझ, मुलुंड पूर्व, कांदिवली पूर्व या सर्वच ठिकाणी किमान तापमान हे १५ अंशांपेक्षा कमी होतं. तर कुलाबा इथं मुंबईतील सर्वाधिक किमान तामपान नोंदलं गेलं आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) नोंदवलेल्या पूर्वानुमानानुसार, ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीतही राज्यात (State) सरासरीपेक्षा किमान तापमान कमी असणार आहे.

कमाल तापमानही या कालावधीत सरासरीपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये पूर्व भारतात तापमानामध्ये घट अपेक्षित आहे. मात्र उर्वरित भारतात तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही.


हेही वाचा -

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

गुगलचं 'हे' अ‍ॅप टिकटॉकला देणार टक्कर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा