Advertisement

गुगलचं 'हे' अ‍ॅप टिकटॉकला देणार टक्कर

व्हिडीओ (Video) बनवणारे अ‍ॅप (App) टिकटाॅक (Ticktack) भारतात खूप लोकप्रिय झालं आहे. भारतासह जगभरात टिकटाॅकचे युजर्स वेगाने वाढत आहेत. टिकटॉकची लोकप्रियता पाहून आता गुगल (google) नेही आपलं एक नवीन शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप (Short video) आणलं आहे.

गुगलचं 'हे' अ‍ॅप टिकटॉकला देणार टक्कर
SHARES

व्हिडीओ (Video) बनवणारे अ‍ॅप (App) टिकटाॅक (Ticktack) भारतात खूप लोकप्रिय झालं आहे. भारतासह जगभरात टिकटाॅकचे युजर्स वेगाने वाढत आहेत. टिकटॉकची लोकप्रियता पाहून आता गुगल (google) नेही आपले टँगी (tangi) नावाचे एक नवीन शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप (Short video making app) आणले आहे. अ‍ॅप गुगलच्या एरिया १२० टीमने तयार केले आहे.  टँगी हे सोशल मीडिया शेअरिंग अ‍ॅप  आहे.  यावर How To (म्हणजेच एखादे अवघड कामं कसं सोपे करता येईल याची माहिती) व्हिडिओ शेअर करता येणार आहे. यामुळे लोकं या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन गोष्टी शिकू शकतील. 

टिकटॉक  (Ticktack) प्रमाणेच या अ‍ॅप (App) वरही युजर्स ६० सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ (Video) तयार करु शकतात. टिकटॉक अ‍ॅप मनोरंजनासाठी अधिक वापरला जात असताना, हा अ‍ॅप एका खास शैक्षणिक उद्देशाने तयार केला गेला आहे. त्यामध्ये  व्हिडिओंसाठी  डीआयवाय, स्वयंपाक, जीवनशैली, कला,  फॅशन आणि ब्यूटी यांसारख्या भिन्न श्रेणी दिल्या आहेत.

सध्या हे अ‍ॅप  (App) अॅपल (Apple) च्या अ‍ॅप स्टोअर (App Store) आणि वेबवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. हे  अॅप युरोपियन युनियन वगळता जगातील सर्व भागात उपलब्ध आहे. मात्र, हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. Android वापरकर्त्यांसाठी अॅप कधी उपलब्ध असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. गुगलने म्हटले आहे की, सध्या या अॅपवर मर्यादित लोकच व्हिडिओ अपलोड करू शकतात. यासाठी,वापरकर्त्यांना प्रथम वेटलिस्टमध्ये सामील व्हावे लागेल.हेही वाचा -

ट्विटरवरील ट्रोलर गँगला रोखणारं 'हे' खास फिचर

टिकटॉकला टक्कर देणार फेसबुकचे 'हे' अॅपसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा