Advertisement

ट्विटरवरील ट्रोलर गँगला रोखणारं 'हे' खास फिचर

आता ट्विटर लवकरच एक खास फिचर आणणार आहे. याचा फायदा ट्रोलर्सला कंट्रोल करण्यासाठी होईल.

ट्विटरवरील ट्रोलर गँगला रोखणारं 'हे' खास फिचर
SHARES

सोशल साईट्सवर ट्रोलर गँगनं अक्षरश: हैदोस घातला आहे. ट्विटरवर तर तुम्ही एखादी पोस्ट केली की ट्रोलर गँग तुमच्यावर हल्लाबोल करतेच. वैचारीक मुद्दे मांडणारे असले तर ठिक. पण असेही ट्रोलर असतात जे घाणेरडी आणि अश्लिल भाषा वापरतात. पण आता ट्विटर लवकरच एक खास फिचर आणणार आहे. याचा फायदा ट्रोलर्सला कंट्रोल करण्यासाठी होईल.


तुमच्याकडे असेल कंट्रोल

अमेरिकेच्या लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो (सीईएस-2020) मध्ये कंपनीनं या फीचरबद्दल माहिती दिली आहे. या फिचरद्वारे युजर्स आपल्या पोस्टवर येणारे रिप्लाय कंट्रोल करू शकतील. म्हणजेच तुमच्या पोस्टवर कोण रिप्लाय करणार आणि कोण नाही हे तुम्ही ठरवू शकाल. फक्त एवढंच नाही तर युजर्सकडे आपल्या ट्विटवर येणारे रिप्लाय हाइड करण्याची सुविधा असेल.


कसे रोखाल ट्रोलर्सना?

युजर्सला स्टेटमेंट, पॅनेल, ग्रुप आणि ग्लोबल हे चार पर्याय मिळतील. स्टेटमेंट पर्याय निवडल्यावर ट्विटवर कोणीही रिप्लाय करू शकणार नाही. पॅनेलमध्ये निवडलेल्या युजर्सच रिप्लाय करू शकतील. ग्रुप पर्यायामध्ये तुम्ही ज्यांना फॉलो करता तेच रिप्लाय करू शकतील आणि ग्लोबल पर्याय निवडल्यावर त्या पोस्टवर कोणीही रिप्लाय करू शकेल.हेही वाचा

टिकटॉकला टक्कर देणार फेसबुकचे 'हे' अॅप

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा