Advertisement

टिकटॉकला टक्कर देणार फेसबुकचे 'हे' अॅप

गेल्या वर्षी फेसबुकनं अमेरिकेत हे अॅप लाँच केलं. आता यावर्षी हे अॅप भारतात सादर केलं जाईल.

टिकटॉकला टक्कर देणार फेसबुकचे 'हे' अॅप
SHARES

टिकटॉक भारतात लाँच होऊन केवळ 27 महिने झाले आहेत. मात्र आतापर्यंत 25 कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. आता टिकटॉकला टक्कर देणारं अॅप लवकरच भारतात लाँच होणार आहे. 'लासो' असं या अॅपचं नाव असून गेल्या वर्षी फेसबुकनं अमेरिकेत हे अॅप लाँच केलं. आता हे अॅप मे महिन्यात भारतात सादर केलं जाईल.

अनेक फिचर्स उपलब्ध

लासो अ‍ॅपच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये एक मोठी लायब्रेरी मिळेल. व्हिडीओ एडिटिंग टूलसोबतच अनेक प्रकारचे इफेक्ट्स मिळतील. युजर्सला ट्रेंड्स आणि हॅशटॅगबद्दल देखील माहिती मिळेल


लोकेशन मोड बंद असलं तरी फेसबुकला कळतं लोकेशन



भारतासोबत इथंही होणार लाँच

लासोच्या प्रमोशनसाठी कंपनी अनेक इंफ्लूएंसर्ससोबत काम करत आहे. मागील वर्षी अमेरिकेत लासो लाँच झाल्यानंतर लोकप्रिय ठरले होते. भारतासह इंडोनेशियामध्ये देखील फेसबूक लासो अ‍ॅप लाँच करणार आहे.



हेही वाचा

चोरीला गेलेला मोबाइल ब्लाॅक करता येणार, सरकारने दिली सुविधा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा