Advertisement

लोकेशन मोड बंद असलं तरी फेसबुकला कळतं लोकेशन

तरीही फेसबुकला तुमचं लोकेशन कळतं. पण कसं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण याचं उत्तर खुद्द फेसबुकनंच दिलं आहे.

लोकेशन मोड बंद असलं तरी फेसबुकला कळतं लोकेशन
SHARES

आपण कुठेही गेलो तरी फेसबुकवर फोटो किंवा पोस्ट टाकतो. कधीकधी तुम्ही एखाद्या एअरपोर्टवर किंवा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये असाल तर तुमच्या फेसबुकवर तुमचं लोकेशन अपडेट होतं. आता तुम्ही बोलाल आम्ही लोकेशन दाखवणारा मोड बंद करतो. पण तरीही फेसबुकला तुमचं लोकेशन कळतं.  पण कसं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण याचं उत्तर खुद्द फेसबुकनंच दिलं आहे

३ प्रकारे कळतं लोकेशन

पहिली पद्धत म्हणजे जे युजर त्यांचा लोकेशन मोड ऑन ठेवतात त्यांचं लोकेशन फेसबुकला कळतं. जे लोकेशन मोड स्विच ऑफ करतात त्यांच्या पोस्टमधून ते नेमके कुठे आहेत याचा ठावठिकाणा शोधून काढता येतो. ही आहे दुसरी पद्धत. आणि तिसऱ्या पद्धतीत डिव्हाइसच्या IP अॅड्रेसवरूनही युजरचं लोकेशन कळू शकतं.


फेसबुकसाठी लोकेशन महत्त्वाचं का?

अमेरिकेतल्या दोन सिनेटर्सनी फेसबुकला पत्र लिहून हा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना फेसबुकनं म्हटलं की, फेसबुकच्या युजर्सची पसंती लक्षात घेऊन जाहिराती दिल्या जातात. त्यावर फेसबुकचं उत्पन्न अवलंबून आहे. त्यामुळे युजरचं लोकेशन कळणं महत्त्वाचं असतं.



हेही वाचा

आता इन्स्टावर शेअर करा एकावेळी सहा फोटो

व्हॉट्स अॅपचे ३ नवीन फीचर लाँच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा