Advertisement

पती-पत्नीच्या नावे घराची नोंदणी करणाऱ्यांना करामधून सूट द्या- शितल म्हात्रे

घराची नोंदणी पतीसह पत्नीच्या नावाने असल्यास कौटुंबिक कलहात महिलांना आधार मिळू शकतो.

पती-पत्नीच्या नावे घराची नोंदणी करणाऱ्यांना करामधून सूट द्या- शितल म्हात्रे
SHARES

मुंबईत पती-पत्नीच्या नावे घराची नोंदणी करणाऱ्यांना घर करातून सूट देण्याची मागणी शिवसेने(Shivsena)च्या नगरसेविका व विधी समितीच्या अध्यक्षा(Chairman of the Municipal and Legal Committee) शितल म्हात्रे (shital mhatre) यांनी केली आहे. अनेकदा कौटुंबिक कलहातून पत्नींना घराबाहेर काढले जाते. राहते घर पतीच्या नावावर असल्यामुळे महिला बेघर होतात. त्यामुळे घराची नोंदणी पतीसह पत्नीच्या नावाने असल्यास कौटुंबिक कलहात महिलांना आधार मिळू शकतो.

हेही वाचाः- वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, १३ लाख जणांवर कारवाई

घरात भांड्याला भांडे लागणे हे काही नवे नाही. छोटमोठ्या कारणांवरून अनेकदा पती-पत्नींमध्ये खटके उडतात. हा वाद अनेकदा विकोपाला जाऊन पती पत्नीवर अत्याचार करत तिला घराबाहेर काढतो. मुंबईसह राज्यात अशी अनेक उदाहणे आहेत. अशा प्रसंगात एका क्षणात महिलांना बेघर केले जाते. अशा प्रसंगात महिलांना त्यांनी राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो.  या घटनांना आळा बसण्यासाठी नव्याने  घर घेताना किंवा घराच्या मालकी हक्काची नोंद करताना पुरुषाबरोबर महिलांची नावे नोंद करावी. तसेच महिलांची नावे नोंद करणाऱ्या घरांना पालिकेने मालमत्ता कर तसेच इतर करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेकडे केली आहे.

हेही वाचाः-महापालिकेच्या फेरीवाला क्षेत्रांना दादरवासीयांचा विरोध

महिलांना आपले हक्काचे घर मिळावे. तसेच कुटुंबात काही वाद झाल्यास त्यांना घराबाहेर कोणी काढणार नाही, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे. महापालिका ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणाऱ्यांना, कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करामध्ये सूट देते त्याच प्रमाणे महिलांची नावे घरामध्ये नोंद करणाऱ्या घरांना करामध्ये सूट द्यावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

हेही वाचाः-
शर्जिल इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालासहीत 51 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा