शर्जिल इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालासहीत 51 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

आझाद मैदान पोलिसांनी उर्वशी चुडावालासहित तेथे घोषणादेत सहभागी झालेल्या 51 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे.

शर्जिल इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालासहीत 51 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
SHARES

मुंबईच्या आझाद मैदान येथे 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात देशद्रोही शर्जिल इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या प्रकरणी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी उर्वशी चुडावालासहित तेथे घोषणादेत सहभागी झालेल्या 51 जणांविरोधात सोमवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 124 अ (राजद्रोह), 153ब, 505 आणि 34 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.

मुंबई प्राइड सॉलिडेटरी गॅदरींग निमित्ताने काही विद्यार्थ्यी 1 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे जमले होते. त्यांचे नेतृत्व उर्वशि चुडावाला करित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जमलेल्या विद्यार्थ्यांनी सीएए, आणि एनआरसी विरोधात घोषणाबाजी केली. त्याच वेळी त्यांनी जेएनयूचा विद्यार्थी नेता शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा ही दिली. या घटनेची गंभीर दखल विरोधीपक्षासह इतर सामाजिक संघटनांनी घेतली. विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणांचा व्हिडिओ  त्याच्या ट्विटर अकाऊन्टवरून शेअर केला. तसेच याबाबत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.
या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी अखेर विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या उर्वशी चुडावालासह 51 जणांवर 124 अ (राजद्रोह), 153ब, 505 आणि 34 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.मात्र, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नसली, तरी या विद्यार्थ्यांची लवकरच धरपकड होऊ शकते.
 
कोण आहे शर्जिल इमाम

शर्जील इमाम बिहारच्या जहानाबादमध्ये राहणारा आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीजचा तो विद्यार्थी आहे. शर्जीलच्या फेसबुक प्रोफाइलच्या मते त्याने आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्समधूस पदव्युत्तर पदवी घेतली आहे. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये सीएए विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात शर्जीलने देशविरोधी वक्तव्य केलं. यानंतर शर्जीलविरोधात आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण पेटल्यावर शर्जील फरार झाला होता. शर्जीलचे वडील अकबर इमाम जनता दल युनायटेडचे नेता होते. २००५ मध्ये त्यांनी जहानाबाद मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र ते या निवडणुकीत हरले होते. शर्जीलचा लहान भाऊ मुजम्मिल इमामदेखील राजकारणात सक्रीय आहे.शर्जीलने प्रक्षोभक भाषण केलं होतो. या चिथावणीखोर भाषणात तो म्हणाला होता, 'आपल्याकडे संघटित लोक असते तर आसामला भारतापासून कायमचं वेगळं केलं असतं.' शर्जिल ला दिल्लीतून अटक करण्यात आली असून तो पोलिस कोठडीत आहे.

शर्जीलच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल

शर्जीलचा हिंसेला चिथावणी देणाऱ्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात 'दिल्लीचे जनजीवन विस्कळीत व्हावे ही आमची इच्छा आहे. दिल्लीच नव्हे तर जगातील प्रत्येक शहरात चक्काजाम झालाच पाहिजे. देशातील अनेक शहरांत मुस्लिम लोक चक्काजाम करू शकतात. मुस्लिमांकडे तेवढी ताकद नाही का? उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्के आहे. तुमची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे तर या शहरांचे जनजीवन सुरळीत कसे सुरू आहे? तुम्ही शहरात राहणारे आहात, तर शहरे बंद करा', अशी चिथावणी शर्जील देत आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा