Advertisement

सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या

सुशांत सिंग राजपूतशिवाय तिनं रिहा चक्रवर्तीसह अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं.

सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या
SHARES

'काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे यांसारखे बॉलिवूड चित्रपट देणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालीआन हिने इमारतीतून उडी मारुन आपले जीवन संपवले आहे.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. तरी याबाबत पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी दिशाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवला असून भावी नव-याचा जबाब नोंदवणं बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिशा गेल्या काही दिवसांपासून निराश होती आणि काल ती आई-बाबांना भेटली होती.

दिशा बॉलिवूड जगातील एक प्रतिभावान पब्लिक रिलेशन मॅनेजर होती. सुशांत सिंग राजपूतशिवाय तिनं रिहा चक्रवर्तीसह अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा