Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपने घरबसल्या करा बँकिंग कामे, 'अशी' आहे व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुविधा

एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँक आणि कोटक महिंद्रा या देशातील चार मोठ्या बँका सध्या आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बँकिंग सुविधा देत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने घरबसल्या करा बँकिंग कामे, 'अशी' आहे व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुविधा
SHARES

डिजिटल बँकिंगमुळे आजकाल बँकिंग करणं खूप सोपं झालं आहे. ऑनलाइन आणि फोन बँकिंगसारख्या सुविधांनंतर लोकांना यूपीआयच्या मदतीने सेकंदात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा देखील मिळत आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकट काळात काही बँकांनी एक पाऊल पुढे टाकत आपल्या ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग ही एक महत्त्वपूर्ण सेवा आहे.  

एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँक आणि कोटक महिंद्रा या देशातील चार मोठ्या बँका सध्या आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बँकिंग सुविधा देत आहेत. या बँकांनी लॉकडाऊन दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सेवा सुरू केली. जर आपले खाते यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता.  

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर ऑनलाइन सेवांप्रमाणेच ही सेवाही विनामूल्य आहे. यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. ही सुविधा कोणाला मिळेल? ज्यांचे मोबाइल नंबर बँकेत नोंदणीकृत आहेत त्यांनाच बँकेची ही विशेष सुविधा उपलब्ध असेल. तुमचा मोबाइल नंबर नोंदणीकृत नसेल तर तुम्हाला या सुविधेचा फायदा घेण्यात काही अडचण येऊ शकते.

या बँकिंग सुविधा उपलब्ध  

  • ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतात
  • शेवटच्या 3 व्यवहाराचा तपशील मिळेल
  • थकित क्रेडिट कार्ड शिल्लक तपासू शकता
  • क्रेडिट कार्डवरील क्रेडिट मर्यादा तपासू शकता
  • डेबिट / क्रेडिट कार्ड ब्लॉक आणि अनब्लॉक करता येईल
  • पूर्व मंजूर कर्जाच्या ऑफरचा तपशील तपासू शकता
  • बचत खाते ऑनलाईन उघडता येईल

व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुविधा कशी मिळवायची  

1)  बँकेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा आणि मिस कॉल द्या.

2) मिस कॉल केल्यावर आपल्याला सदस्यत्व मिळेल.

3) आपल्याला बँकेच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून एक स्वागत संदेश मिळेल

. 4) कोणत्याही बँकिंग सेवेसाठी व्हॉट्सअ‍ॅपवरुन चॅट सुरू करण्यासाठी 'हाय' असा संदेश टाइप करा.

5) आता आपण गरजेनुसार पर्याय निवडू शकता.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेची व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी ग्राहकांना  8640086400 हा नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँकिंग सुविधा सुरू होईल.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 70659 70659 वर एसएमएस पाठवावा लागेल किंवा मिस कॉल द्यावा लागेल. 70659 70659 वर 'Hi' मेसेज पाठविल्यानंतर आपल्याला स्वागत संदेश मिळेल.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावरुन 9718566655 वर मिस कॉल द्यावा लागेल. आपल्या मोबाइल संपर्क यादीमध्ये 022 6600 6022 सेव्ह करून  व्हॉट्सअ‍ॅपवरून 'मदत' असा मेसेज पाठवावा लागेल.

येस बँक

येस बँकेच्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सेवा सुरू करुन घेण्यासाठी 91-829-120-1200 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला ही सेवा सुरु करण्यासाठी एका लिंकसह एसएमएस येईल. 91-829-120-1200 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करून या नंबरवर 'Hi' असा मेसेज करा.हेही वाचा-

कोरोना काळातही रिलायन्सला १३ हजार २४८ कोटींचा नफा

आयटीआर भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, 'ही' आहे अंतिम तारीख
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा