Advertisement

कोरोना काळातही रिलायन्सला १३ हजार २४८ कोटींचा नफा

कोरोनाच्या संकट काळातही भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा झाला आहे.

कोरोना काळातही रिलायन्सला १३ हजार २४८ कोटींचा नफा
SHARES

कोरोनाच्या संकट काळातही भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला १३ हजार २४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला १० हजार १४१ कोटींचा नफा झाला होता. यंदा नफ्यात ३१ टक्के वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केलेल्या निकालांनुसार, या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ४२ टक्क्यांची घट येऊनही कंपनीला १३ हजार २४८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला १ लाख ९२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षीच्या या तिमाहीत कंपनीला १ लाख ७४,०८७ कोटींचा महसूल मिळाला होता.  

बीपी सौद्यातून मिळालेले ४,६९९ कोटी रुपयांचे एकरकमी उत्पन्न, जिओची चांगली कमाई आणि खर्चात कपात केल्यामुळे यंदा कंपनीला चांगला नफा झाला आहे. रिलायन्स जिओला एप्रिल-जून तिमाहीत २,५२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षाच्या या कालावधीच्या तुलनेत हा नफा १८२.८ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी जून तिमाहीत जिओला ८९१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यासोबतच तिमाहीत जिओचे ९९ लाख ग्राहक वाढले. तसंच एकूण ग्राहक ३९ कोटी ८३ लाखांवर गेले. कंपनीचे प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न (एआरपीयू) सुमारे १० रुपयांनी वाढून दरमहा १४०.३ रुपये झाले आहे.


हेही वाचा -

उद्योगपती अनिल अंबानीचे कार्यालय येस बँकेकडून सील

एसबीआयमध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी भरती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा