उद्योगपती अनिल अंबानीचे कार्यालय येस बँकेकडून सील

अनिल अंबानी २००८ मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, टेलिकॉम, पॉवर आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढताच आहे.

उद्योगपती अनिल अंबानीचे कार्यालय येस बँकेकडून सील
SHARES

येस बँकचे कर्ज थकवल्या प्रकरणी उद्योगपती अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचं मुंबईतील मुख्यालय असलेलं रिलायन्स सेंटर हे बँकेने जप्त केलं आहे. या जप्तीच्या कारवाईत अनिल अंबानी यांचे सांताक्रूझमधील २१ हजार चौरस फूटाचे कार्यालय आणि दक्षिण मुंबईतील नागिन महलमधील दोन मजल्याचा समावेश आहे. येस बँकेने फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये दिलेल्या एका जाहिरातीत हीकारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचाः- ग्रामीण भागातील रुग्णालयांना दिल्या जाणार ५०० रूग्णवाहिका – राजेश टोपे

एकेकाळी बड्या उद्योगपतींच्या रांगेत अनिल अंबानी यांचे नाव चर्चेत असायचे. मात्र सध्या कर्जबाजारी उद्योगपतीच्या रागेत अनिल अंबानी यांचे नाव पुढे आहे. येस बँकेचे २८९२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्या प्रकरणी अनिल अंबानी यांच्या मालमत्तेवर येस बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. या कारवीत रिलायन्स सेंटरचा सिक्युरिटायजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अ‍ॅसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अ‍ॅक्टनुसार २२ जुलैला ताबा घेण्यात आला. आधीच येस बँक स्वतःच मोठ्या अडचणीत आहे. अनेकांना दिलेल्या कर्जाचा मोठा भार हा बँकेवर आहे. त्यात बँकेने अनिल अंबानी ग्रुपला १२ हजार कोटी रुपये कर्ज दिले होते. या कारवाईपूर्वी अनिल अंबानी यांच्या कंपनीला ६० दिवसांची नोटीस जारी केली होती. ज्याची मुदत ५ मे रोजीच संपली. कंपनी कर्ज फेडू न शकल्याने अखेर बँकेने जप्तीची कारवाई केल्याचे  बोलले जाते. अनिल अंबानी २००८ मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, टेलिकॉम, पॉवर आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढताच आहे.

हेही वाचाः- कोरोनाच्या लढाईत १०० पोलिसांचं बलिदान


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा