Advertisement

अनिल अंबानी दिवाळखोरीत, रिलायन्स इन्फ्रा विकायला काढली

मागील आठवड्यात लंडनच्या कोर्टाने अनिल अंबानी यांना 3 चिनी बँकांचे 4 हजार 760 कोटी रुपये 21 दिवसांच्या आत फेडण्याचे आदेश दिले आहेत.

अनिल अंबानी दिवाळखोरीत, रिलायन्स इन्फ्रा विकायला काढली
SHARES
Advertisement

उद्योजक अनिल अंबानी दिवाळखोरती गेले आहेत. बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी अंबानी यांनी त्यांची दिल्लीत वीज पुरवठा करणारी रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी विकायला काढली आहे. रिलायन्स इन्फ्रासाठी इटलीतील एनेल ग्रुप, ग्रीनको आणि टोरंट पॉवर या कंपन्यांनी बोली लावली आहे. रिलायन्स इन्फ्राचे बाजार मूल्य ५००० कोटींच्या आसपास आहे.

मागील आठवड्यात लंडनच्या कोर्टाने अनिल अंबानी यांना 3 चिनी बँकांचे 4 हजार 760 कोटी रुपये 21 दिवसांच्या आत फेडण्याचे आदेश दिले आहेत. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, (आयसीबीसी) मुंबई शाखा, चायना डेव्हलपमेंट बैंक आणि  एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या बँकांकडून अंबानी यांनी कर्ज घेतलं आहे. या कर्जाची त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.  कर्जफेड न केल्यास तुरुंगात टाकण्याचा निर्वाणीचा इशारा न्यायालयाने अनिल अंबानी यांना दिला होता. त्यानुसार अंबानी यांनी पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

रिलायन्स इन्फ्राच्या केपीएमजी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्स इन्फ्राची बीएसईएस राजधानी पॉवर आणि बीएसईएस यमुना पॉवर  या दोन कंपन्यांमध्ये ५१ टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित ४९ टक्के हिस्सा दिल्ली सरकारचा आहे. रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर या दोन कंपन्यांकडून दिल्लीतील ९३ टक्के ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.

अंबानी यांनी दोन वर्षांपूर्वी मुंबईतील वीज वितरण व्यवसाय अदानी ट्रान्समिशन या कंपनीला १८ हजार ८०० कोटीला विक्री केला होता. मात्र दिल्लीतील विक्री लिलावात अदानी समूहाने चार हात लांब राहणे पसंत केले आहे. हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना
संबंधित विषय
Advertisement