कोरोनाच्या लढ्यात देशभरात ताज किचनकडून रोज सुमारे ३ लाख जेवणाची पाकिटं वाटली जात होती. ताज ट्रस्टच्या माध्यमातून २३ मार्चपासून करोनाशी लढणाऱ्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांना मोफत जेवण दिलं जात होतं. परंतु, हा आता डॉक्टरांना अन्न पुरविण्याचा हा करार २३ मे पर्यंतच होता. त्यामुळं या कराराची अंतिम तारीख संपुष्टात आल्यानं यापुढे आपल्याला चांगले जेवण कसे मिळणार असा प्रश्न निवासी डॉक्टर तसंच, आरोग्यसेवकांपुढे निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. परंतु, या जेवणाचा दर्जाबाबत निवासी डॉक्टरांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर हॉस्पिटल तसेच कस्तुरबासह प्रमुख रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी रोज सकाळ संध्याकाळ जेवणाची काही हजार पाकिटे दिली जात होती.
या जेवणात डाळ- भात, ब्राऊन ब्रेड, योगर्ट, कापलेली फळं तसेच सफरचंद, सॉफ्ट ड्रिंक व पाण्याची बाटली यांचा समावेश होता. गेले २ महिने ताज किचनचे हे उत्तम दर्जाचं जेवण दिलं जात होतं. याची मुदत २३ मे रोजी संपणार असली तरी प्रत्यक्षात २५ मे पर्यंत जेवण पुरविण्यात येणार असल्याचं केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केलं.
आगामी काळात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना महापालिका असेच दर्जेदार जेवण देणार का असा प्रश्न निवासी डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कॅन्टीनमध्ये जेवायचे असल्यास स्वखर्चाने जेवावे लागत होते. मात्र कोरोनाच्या काळात कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी कोरोनाची बाधा झाल्यानं तसंच, कर्मचारी गावी निघून गेल्यामुळं बहुतेक कॅन्टीन बंद पडली होती.
जेवणाची व्यवस्था पाहाणे हे अधिष्ठात्यांचे काम आहे का? असा सवाल काही निवासी डॉक्टर व ज्येष्ठ डॉक्टरांनी उपस्थित केला. यावर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा सर्व खर्च महापालिकाच करणार आहे. यासाठीच्या खर्चाची फाईल २ दिवसांपूर्वीच मंजूर केली आहे. अधिष्ठात्यांना याबाबतचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत, असं अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं.
हेही वाचा -
सी.एस.आर. निधीतून जे.जे. रुग्णालयात 50 वेंटिलेटर
अनेक विमानं रद्द, विमानतळावर प्रवाशांची गर्दी