Advertisement

अनेक विमानं रद्द, विमानतळावर प्रवाशांची गर्दी


अनेक विमानं रद्द, विमानतळावर प्रवाशांची गर्दी
SHARES

लॉकडाऊनमुळं तब्बल २ महिने बंद असलेली विमान सेवा सोमवारपासून सुरू झाली आहे. मुंबईतून देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या २५ विमानांचं लँडिंग आणि २५ विमानांचं टेक-ऑफ होणार आहे. विमान सेवा सुरू झाल्यानं विमानतळावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई विमानळावरून सोमवारी सकाळी ५ वाजता पहिलं विमान दिल्लीसाठी रवाना झालं आहे.

सोमवारपासून विमान सेवांना सुरूवात झाली असली तरी, काही विमानं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळं विमानतळावरील प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच, अनेक प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरं जाव लागत आहे. 

दरम्यान, सोमवारपासून मुंबईत प्रत्येकी २५ विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ होणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यानंतर हळूहळू ही संख्या वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासोबत संवाद साधला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

अखेर महाराष्ट्रातही सोमवारपासून सुरू होणार विमान सेवा

सी.एस.आर. निधीतून जे.जे. रुग्णालयात 50 वेंटिलेटर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा