Advertisement

अखेर महाराष्ट्रातही सोमवारपासून सुरू होणार विमान सेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळं विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, ही विमान वाहतूक सेवा सोमवारपासून सुरू होणार आहे.

अखेर महाराष्ट्रातही सोमवारपासून सुरू होणार विमान सेवा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळं देशांतर्गत विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, ही विमान वाहतूक सेवा सोमवारपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारनं देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली आहे. ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोनमध्ये आणून संसर्ग/प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा, असा सवाल उपस्थित करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विमान वाहतुकीविरोधाचा सूर आळवला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर सरकारच्या भूमिकेत बदल झाला. 

सोमवारपासून मुंबईत प्रत्येकी २५ विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ होणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यानंतर हळूहळू ही संख्या वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतून देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या २५ विमानांचं लँडिंग आणि २५ विमानांचं टेक-ऑफ होणार आहे. हळूहळू हा आकडा वाढवण्यात येणार आहे. राज्य सरकार याबद्दलची नियमावली लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. 

हेही वाचा - राज्यातली चारही विमानतळंं रेड झोनमध्ये, विमानसेवा सुरू करण्यास महाराष्ट्राचा ठाम नकार

देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासोबत संवाद साधला आहे. मुंबई विमानतळावरून वाहतूक सुरू करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. परंतु, यानंतर काही तासांमध्येच मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतून विमान वाहतूक सुरू असणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा - विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करणार- मुख्यमंत्री

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा