मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने कोरोना विरोधातल्या लढाईत औद्योगिक समुह देखील महत्त्वाची भूमीका बजावत आहेत. औद्योगिक समुहांच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी (C.S.R)निधीच्या माध्यमातून वैद्यकिय यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ' अमेरिकन इंडिया फाऊंडेशन' च्या माध्यमातून जे. जे. रुग्णालयाला 50 व्हेंटिलेटर आज देण्यात आले आहेत.
कोरोना विरोधातल्या लढाईत व्हेंटिलेटर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्या ज्या रुग्णांना श्वास घेण्यामध्ये अडचणीं येत आहे. अशांचे प्राण वाचवण्यासाठी व्हेंटिलेटर अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे यापुढे रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. त्याच बरोबर कोरोना रुग्णांनासाठी इतर ही महत्वाच्या गोष्टींसाठी प्रशासन खंबीर आहे.
भायखळा येथील रिचर्डसन ॲण्ड क्रूडास कंपनीच्या जागेवर निर्माणाधीन असलेल्या कोरोना काळजी केंद्र (जम्बो फॅसिलिटी) व्यवस्थेची राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी रविवारी पाहणी केली. या केंद्रात सुमार 800 खाटा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून त्यातील 300 खाटा या आँक्सीजन पुरवठा होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी पालकमंत्री शेख यांना कोरोना सेंटर केंद्राबाबत सविस्तर तपशील दिला.