Advertisement

मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन

मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
SHARES

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार म्हणजे उद्या दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात देखील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली, बदलापूरमध्ये देखील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे.

मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी करण्यात आला आहे. 

तर मुंबई आणि ठाण्यासह इतर किनारी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे पाऊल उचलले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा