Advertisement

अनिल अंबानींना झटका, 3 चिनी बँकांचे 5 हजार कोटी 21 दिवसात देण्याचे आदेश

लंडनच्या कोर्टाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अनिल अंबानी यांना 100 मिलियन डॉलर एवढी रक्कम सहा आठवड्यात देण्याचा आदेश दिला होता.

अनिल अंबानींना  झटका, 3 चिनी बँकांचे 5 हजार कोटी 21 दिवसात देण्याचे आदेश
SHARES

उद्योगपती अनिल अंबानी यांनी आता मोठा झटका बसला आहे. वैयक्तिक हमीच्या एका प्रकरणात लंडनच्या  कोर्टाने अनिल अंबानी यांना 3 चिनी बँकांचे 5 हजार कोटी रुपये 21 दिवसांच्या आत फेडण्याचे आदेश दिले आहेत.

इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, (आयसीबीसी) मुंबई शाखा, चायना डेव्हलपमेंट बैंक आणि  एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या बँकांचं कर्ज अनिल अंबांनी यांना आता फेडावं लागणार आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांनी वैयक्तिकरित्या हमी दिली आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम फेडावीच लागेल असं कोर्टाने म्हटलं आहे. हे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) 2012 मध्ये घेतलेल्या कॉर्पोरेट लोनशी संबंधित आहे. पण या कर्जासाठी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली नव्हती, असा दावा अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे. आरकॉमवर 46 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. 

लंडनच्या कोर्टाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अनिल अंबानी यांना 100 मिलियन डॉलर एवढी रक्कम सहा आठवड्यात देण्याचा आदेश दिला होता. तेव्हा अनिल अंबानी यांनी कोर्टात सांगितलं होतं की, सध्या माझं नेटवर्थ शून्य झालं आहे आणि कुटुंब मदत करत नाही. त्यामुळे मी 100 मिलियन डॉलर फेडण्यास सक्षम नाही. दरम्यान, आम्ही लंडनमधल्या कोर्टाच्या निर्णयाबाबत कायदेशीर पर्यायांवर विचार करत असल्याचंही प्रवक्त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

एमबीए सीईटीचा निकाल जाहिर

मुंबईला ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा