एमबीए सीईटीचा निकाल जाहीर


एमबीए सीईटीचा निकाल जाहीर
SHARES

एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल शनिवारी जाहिर झाला आहे. सकाळी ११ वाजता जाहीर झाला असून, राज्यातील ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्वपरीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. 

या परीक्षेला राज्यभरातून एक लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते. परीक्षेचा निकाल सीईटी सेलच्या वेबसाइटवर जाहीर होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार, या साईटवर निकाल जाहिर झाला आहे.

गेल्यावर्षी बोगस प्रवेश आढळल्यानं यंदा 'एमबीए', 'एमएमएस' प्रवेशांसाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची 'सीईटी', 'सीमॅट' आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी 'कॅट' ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळं यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेशपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, असे सीईटी सेलने यापूर्वीच सष्ट केले आहे.

संबंधित विषय