येस बँक घोटाळा: वाधवान बंधुंना ईडीकडून अटक


येस बँक घोटाळा:  वाधवान बंधुंना ईडीकडून अटक
SHARES
दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे(डीएचएफएल)कपील व धीरज वाधवान यांना मनी लाँडरीगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने अटक केली. याप्रकरणी दोघांनाही 10 दिवसाची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.  येस बँक गैरव्यवहाराप्रकरणी दोघांनाही याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) अटक केली होती.

लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करणा-या वाधवान बंधू चर्चेत आले होते. येस बँक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने वाधवान बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 26 एप्रिलला सीबीआयने अटक केली होती. त्याप्रकरणी आठ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत होते. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दोघांचीही रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात या दोघांनी जामिनासाठी अर्ज केले होते. पण ते अर्ज न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर गुरूवारी या दोघांनाही ईडीने अटक केली. येस बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणातील मनी लाँडरींगप्रकरणी ईडी तपास करत आहे. 

याशिवाय उत्तर प्रदेशातील दोन ट्रस्टमधील पैसे बेकायदेशिररीत्या व्यवहारात आणल्याप्रकरही ईडी तपास करत आहे. सीबीआयच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहे. येस बँकेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर ईडीने बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर राणा कपूर यांना  अटक करण्यात आली होती.  याप्रकरणी दाखल कपूर व त्यांच्या कुटुंबियांवर बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होते. या कंपनीत कूपर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समाभाग आहेत.  त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बँकेचे ३ हजार 700 कोटींच कर्ज होते.  


राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या त्यावर प्रकार टाकण्यात आला आहे. हे कर्ज देताना गहाण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत 40 कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किंमतीची असल्याचे दाखवण्यात आले होते. याप्रकरणी राणा व त्यांच्या पत्नीचे व्यवहार पाहणा-या एका महिलेचीही ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे याप्रकरणी कपूर यांच्याशी संबंधीत 104 कंपनी आता ईडीच्या रडावर आहेत. त्याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे. दरम्यान, यात कोणताही बेकायदा व्यवहार नसून बँकेतील गैरव्यवहाराचा कोणताही कट केला नसल्याचे डीएचएफएलकडून यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात वाधवान कुटुंबियांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. वाधवान कुटुंबाच्या 23 सदस्यांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पाच गाड्यांना या प्रवासासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यात संबंधीत व्यक्ती आपले आपले मित्र आहेत, त्यांना आपतकालीनस्थीतीत त्यांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याचे शिफारस पत्र प्रधान सचिव अभिताभ गुप्ता यांनी दिले होते.  प्रधान सचिव दर्जाच्या या अधिका-याने स्वतःच्या शासकीय लेटरहेडवर हे पत्र दिल्यामुळे आता त्याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.

मुख्यमंत्र्यांसोबत आपण याविषयी चर्चा केल्यानंतर अमिताभ गुप्ता यांच्याविरोधातील चौकशी सुरू असेपर्यंत  त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. याप्रकरणानंतर केंद्रीय यंत्रणा खडबडून जाग्या  झाल्या होत्या. त्यांनी तात्काळ साता-याला धाव घेतली. त्यानंतर सीबीआयने वाधवान बंधुंना अटक केली होती.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा