कोरोनाच्या लढाईत १०० पोलिसांचं बलिदान

पोलिस अनफिट असल्यामुळे या आजाराला जास्त बळी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. ड्युटीचे अनिश्चित तास, व्यायामाचा अभाव प्रकृतीच्या तक्रार, असंतुलीत आहार यासगळ्यांचा अप्रत्यक्षरित्या प्रभाव त्यांच्या आरोग्यावर होतो.

कोरोनाच्या लढाईत १०० पोलिसांचं बलिदान
SHARES

लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. कोरोनाने आतापर्यंत तब्बल १०० पोलिसांचा बळी घेतला आहे. एका अहवालातून पोलिस अनफिट असल्यामुळे या आजाराला जास्त बळी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. ड्युटीचे अनिश्चित तास, व्यायामाचा अभाव  प्रकृतीच्या तक्रार, असंतुलीत आहार यासगळ्यांचा अप्रत्यक्षरित्या प्रभाव त्यांच्या आरोग्यावर होतो. यामुळंच रोगप्रतिकार शक्तीही कमी झाली असल्याने पोलिस या आजाराला मोठ्या प्राणात बळी पडत असल्याचे बोलले जाते.

हेही वाचाः- 'इतके' रुग्ण सापडले तरच बिल्डींग होणार सील, बीएमसीने नियम बदलला

 राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या ९ हजार ०९६ वर पोहोचली आहे. यात सर्वात जास्त प्रमाण हे मुंबई पोलिसांचे आहे. असे असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवस-रात्र ारोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत आहे. मागील २४ तासात १३८ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलिस दलातील सध्या अँक्टीवर रुग्णांची संख्याही १९१२ इतकी आहे. तर ९ हजार ०९६ पैकी ७ हजार ८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील बहुतांश पोलिस हे पून्हा नागरिकांच्या रक्षणासाठी सेवेत रूजूही झालेत. मागील २४ तासात २ पोलिस कर्मचारी या आजाराला बळी पडलेले आहेत. त्यात ८ अधिकारी आणि ९२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस परिस्थितीती बिकट होच चालली आहे. पोलिसांमधील कोरोनाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबईतल्या  ९४ पोलिस ठाण्यात रॅपिड अँटिजन टेस्ट ही करण्यात आल्या, पोलिसांसाठी स्वतंत्र क्वारनटाइन सेंटरही उभारण्यात आली आहेत. मुंबई पश्चिम उपनगरात ३४६६ पोलिसांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ७७ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवरील ताण हा दिवसेंदिवस वाढत आहेत.

हेही वाचाःगृहमंत्र्यांचा मोठा निर्णय ! कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत पोलिसांना सेवा निवासस्थान ठेवण्याची मुभा

सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एरव्हीची कामं पाहून लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं, अतिसंक्रमित क्षेत्रात बंदोबस्त करणं, दुकानं बंद आहेत की नाहीत हे पाहणं अशी कामं पोलिसांना करावी लागत आहेत. विलगीकरण केंद्र, कोरोना उपचार केंद्रावरही पोलिसांची नियुक्त असते. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांच्या अपेक्षित संख्येत आधीच कमतरता असताना आता आणखी कामं करावी लागत असल्यानं पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक ताण आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं, गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोचवणं ही पोलिसांची खरी कामं; परंतु आता या कामांच्या बरोबरीने अतिमहत्त्वाच्या व्यक्तंीचा बंदोबस्त, त्यांना सुरक्षा, रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन, धार्मिक स्थळी बंदोबस्त, अपघातस्थळी धावून जाणं, आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणं अशी नानाविध कामं करावी लागतात. यामुळे पोलिसांची कार्यक्षमता कमी होत असून त्यांच्या कामाचं मूल्यमापनही चुकीच्या पध्दतीने केलं जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा