Advertisement

'इतके' रुग्ण सापडले तरच बिल्डींग होणार सील, बीएमसीने नियम बदलला

कोरोना रुग्ण सापडणाऱ्या इमारती सील करण्याच्या नियमात मुंबई महापालिकेनं आता बदल केला आहे.

'इतके' रुग्ण सापडले तरच बिल्डींग होणार सील, बीएमसीने नियम बदलला
SHARES

कोरोना रुग्ण सापडणाऱ्या इमारती सील करण्याच्या नियमात मुंबई महापालिकेनं आता बदल केला आहे. या नवीन बदलानुसार, तीनपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतरच पूर्ण इमारत सील केली जाणार आहे.


मुंबई महापालिकेने एक जरी कोरोना रुग्ण सापडला तरी इमारत  सील करण्याचा निर्णय घेतला होता. या  पालिकेच्या निर्णयावर रहिवाशांनी नाराजी दर्शवली होती.  ज्या सोसायटीत १०० हून अधिक फ्लॅट्स असतील त्या सोसायटीतील नागरिकांना बाहेर ये-जा करण्यास मोठी गैरसोय होऊ शकते. एका रुग्णासाठी अनेक फ्लॅट्स सील करणे पूर्णपणे नियमबाह्य आहे, असं रहिवाशांचं म्हणणं होतं. त्यामुळे  मुंबई महापालिकेनं कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या बिल्डिंग सील करण्याच्या नियमात बदल केला आहे. 


एका बिल्डिंगमध्ये जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले, तर संपूर्ण बिल्डिंग सील केली जाईल. तीन पेक्षा कमी रुग्ण असतील तर संबंधित मजला सील केला जाईल. बिल्डिंगमधील इतर रहिवाशांवर बाहेर ये-जा करण्यावर कसलीही बंधन असणार नाही. अशी माहिती महापालिकेच्या आर दक्षिण वार्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ८८२ एवढी असून ८४,५७० रुग्ण बरे झाले आहेत तर १९,९९० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा