भयंकर ! ४८ तासांत ३५२ पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यातील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा आठ हजार ५८४ वर पोहोचला आहे. त्यात ८९२ अधिकारी व ७ हजार ६९२ कर्मचा-यांचा समावेश आहे.

भयंकर ! ४८ तासांत ३५२ पोलिसांना कोरोनाची लागण
SHARES

राज्यात कोरोनाचा हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही पोलिस दलात कोरोनाचे संक्रमण हे दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील ४८ तासात राज्यात तब्बल ३५२ पोलिसांना कोरोना झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांची आता रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे.

हेही वाचाः- मुंबईत आतापर्यंत 'इतके' कोरोना रुग्ण झाले बरे

देशभरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. पण करोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट यायला अजूनही बराच वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. काही वेळा चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचे निधन होत असल्याचे प्रकार टाळण्यासाठी ‘इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने काही दिवसांपूर्वी रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टला मंजुरी दिली. या चाचणीमुळे आता जलदगतीने करोना चाचणीचा रिपोर्ट मिळणे शक्य होत असून रुग्णाला वेळीच उपचारही मिळणार आहे.  राज्यातील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा आठ हजार ५८४ वर पोहोचला आहे. त्यात ८९२ अधिकारी व ७ हजार ६९२ कर्मचा-यांचा समावेश आहे. गेल्या ४८ तासांत राज्यातील कोरोनाबाधीत पोलिसांचा आकडा ३५२ ने वाढला आहे. राज्य पोलिस दलातील ६ हजार ५३८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचाः- सरकार चालवून तर दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

  महाराष्ट्र पोलिस दलात सद्यस्थितीला १९५२ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात २२० अधिकारी आणि १७३२ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यात ९४ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेळीत या संसर्गाला आवरले नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणूनच मुंबई पोलिस दलात २४ जुलै ते २९ जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिकविभागातील परिमंडळानुसार  ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन  टेस्ट’ची  टेस्ट सुरू करण्यात आली आहे.प्रतिबंधात्‍मक क्षेत्र, कोरोना आरोग्‍य केंद्र तसेच अलगीकरण केंद्र यासह नाकाबंदी व बंदोबस्‍ताच्‍या कर्तव्‍यावर देखील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. अशा पोलिस कर्मचा-यांचीही ‘अँटीजेन कीट’ द्वारे कोविड चाचणी केली जात आहे.  २४ जुलैला मुंबई पोलीस दलातील  एक हजार ५२५ कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. त्यात ३१ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे अधिका-याने सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा