Advertisement

सरकार चालवून तर दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

सरकार पाडण्यात आम्हाला बिलकूल रस नाही. आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोत. पण रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, असं आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.

सरकार चालवून तर दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
SHARES

सरकार पाडण्यात आम्हाला बिलकूल रस नाही. आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोत. पण रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, असं आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं. सामनाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी “मी इथंच बसलोय, मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा”, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत ते भाषण करत होते. (bjp not interested to destabilise maha vikas aghadi government says devendra fadnavis)

महाविकासआघाडीचं सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर विश्वासघात करून सत्तेत आलेलं सरकार आहे. हे सरकार पाडण्यात आम्हाला बिलकूल रस नाही. कारण तुम्ही एकमेकांची तंगडी ओढायला सक्षम आहात. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे. पण तुम्ही किमान सरकार चालवून दाखवावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, कोरोनाच्या चाचणीत महाराष्ट्र देशात १९ व्या क्रमांकावर आहे. मुंबईत तर चाचण्या फारच कमी केल्या जातात. त्यामुळे मृत्यूदर वाढतो आहे. एक महिना मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या, तर मुंबईत परिवर्तन झालेलं दिसेल. 

हेही वाचा - तीनचाकी रिक्षा कुठं न्यायची, हे मागे बसलेलाच ठरवतो - देवेंद्र फडणवीस

कोरोनाचं संकट ओळखून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठं काम केलं. मुंबईत मोठ्या संसर्गामुळे काम करणं अतिशय कठीण होतं. तरीसुद्धा अतिशय चांगलं काम पक्षाने केलं. यादरम्यान ३० कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले. आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत.

क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत. अनेक पालिका-महापालिकांना आर्थिक मदत नाही. राज्य सरकारने योग्य पाऊले टाकली तर महाराष्ट्र लवकर या समस्येतून बाहेर पडेल, अशा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, या तीन चाकी सरकारचं स्टिअरिंग भलेही उद्धव ठाकरेंच्या हाती असो, ही रिक्षा कुठं न्यायची हे चालक नाही, तर मागे बसलेली सवारी ठरवते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा - लाॅकडाऊन वाढवू नका, नाहीतर लोकं उपासमारीने मरतील- प्रकाश आंबेडकर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा