Advertisement

लाॅकडाऊन वाढवू नका, नाहीतर लोकं उपासमारीने मरतील- प्रकाश आंबेडकर

लॉकडाऊन वाढवू नका, अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपल्याला विनंती आहे, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लाॅकडाऊन वाढवू नका, नाहीतर लोकं उपासमारीने मरतील- प्रकाश आंबेडकर
SHARES

राज्य सरकारने लाॅकडाऊन आणखी वाढवू नये, तसं झाल्यास लोकं बेरोजगारी आणि उपासमारीने मरतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्याची बिघडलेली आर्थिक घडी कशी बसवता येईल, याकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावं, तरच माणसं जगतील, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. (do not extend lockdown in maharashtra demands vba chief prakash ambedkar to cm uddhav thackeray)

येत्या ३१ जुलै रोजी लाॅकडाऊनची मुदत संपत आहे. कोरोना प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी राज्यभरात लागू केलेला लॉकडाऊन हा कंटाळा घालवण्यासाठी केलेला नव्हता. त्यामुळं कुणाला कंटाळा आला म्हणून लाॅकडाऊन उठवताही येणार नाही. घाईघाने लॉकडाऊन उठवला आणि लोकांचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न लाॅकडाऊन उठवण्याची मागणी करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत विचारला होता. 

हेही वाचा - Prakash Ambedkar: कोरोना हे तर सरकारचं नाटक, प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले की, उद्धव ठाकरे, यांना विनंती की खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने सगळ्यांना भीती घातली. मी सुद्धा त्यावेळी भ्यायलो होतो. देशातले ४० टक्के लोकं कोरोनाबाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीनं सांगितलं होतं. पण पुढच्याच आठवड्यात भारतात कोरोना व्हायरस पसरु शकणार नाही. कारण भारतीयांची रोगप्रतिकारकशक्ती फार चांगली आहे, असं ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं. सध्याच्या परिस्थितीवरून तरी ऑस्ट्रेलिया जिंकत आहे, असं दिसतंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

कोरोना मृत्यूदर आजघडीला २ टक्के किंवा त्याच्या थोडावर असताना दिसत आहे. माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण अटक आहे. अशी गौतम बुद्धांची शिकवण आहे. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावं. तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीनं माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवू नका, अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपल्याला विनंती आहे, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा - कुणाला कंटाळा आला म्हणून लाॅकडाऊन उठवता येणार नाही- मुख्यमंत्री

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा