Advertisement

कुणाला कंटाळा आला म्हणून लाॅकडाऊन उठवता येणार नाही- मुख्यमंत्री

घाईघाने लॉकडाऊन उठवला आणि लोकांचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?,' असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

कुणाला कंटाळा आला म्हणून लाॅकडाऊन उठवता येणार नाही- मुख्यमंत्री
SHARES

कोरोना प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी राज्यभरात लागू केलेला लॉकडाऊन हा कंटाळा घालवण्यासाठी केलेला नव्हता. त्यामुळं कुणाला कंटाळा आला म्हणून लाॅकडाऊन उठवताही येणार नाही. घाईघाने लॉकडाऊन उठवला आणि लोकांचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?,' असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (maharashtra cm uddhav thackeray clarifies over lockdown in saamana interview )

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांना 'लॉकडाऊन कधी उठणार? हाच सध्या राज्यातील जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. लोक कंटाळले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लाॅकडाऊनसंदर्भात आपली भूमिका मांडली.

हेही वाचा - मुंबई लोकल ट्रेन सुरू करता येईल, पण.., आयुक्तांचं महत्त्वाचं वक्तव्य

यावर पुढं बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनचा विषय नीट समजून घेणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा शहरं लॉकडाऊन करण्याची वेळ ही केवळ आपल्यावरच आलेली नाही. तर हे जागतिक कटू सत्य आहे. या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारं आणि बोलणारं जगामध्ये कोणीच नाही. एका बाजूला लॉकडाऊन लागू करण्याच्या बाजूने आहेत, तर दुसऱ्या बाजूला लाॅकडाऊनला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाऊनने काय साधलं?, लॉकडऊन म्हणजे उपचार आहे का?, लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेला फटका बसला, असं म्हणणारे आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार मी लाॅकडाऊन पूर्ण उघडलं आणि त्यानंतर दुर्देवाने लोकं मृत्यूमुखी पडले, तर त्याची जबाबदारी घेणार का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन उघडण्याची मागणी करणाऱ्यांना केला.

सरकार म्हणून आपण एकेक गोष्ट सोडवत चाललो आहोत. घाईघाईने लॉकडाऊन करणं जसं चूक आहे, तसं घाईघाईनं तो उठवणंही चूक आहे. माझा प्रयत्न असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट बंद होता कमा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा किंवा नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही. जे केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता केली पाहिजे. तसंच जे केवळ आरोग्याची चिंता करत आहेत त्यांनी आजच्या घडीला हे जरी सत्य असलं तरी थोडी आर्थिक चिंता पण करायला हवी. ही तारेवरची कसरत आहे. 

लॉकडाऊन उठवल्यानंतर साथीचा उद्रेक झाला आणि जीव गेले तर काय करणार? कारखान्यांमध्ये साथ घुसली तर काय करणार? माणसे मेली तरी चालतील पण लॉकडाऊन नको हे चालेल का? माझी त्याला तयारी नाही. मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या डोळ्यासमोर माझी माणसं तडफडताना मी बघू शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा