Advertisement

मुंबई लोकल ट्रेन सुरू करता येईल, पण.., आयुक्तांचं महत्त्वाचं वक्तव्य

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर रविवारी ६६ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. शिवाय रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन १.०३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. अशा स्थितीत मुंबई अनलाॅक करता येऊ शकेल.

मुंबई लोकल ट्रेन सुरू करता येईल, पण.., आयुक्तांचं महत्त्वाचं वक्तव्य
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर रविवारी ६६ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. शिवाय रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन १.०३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. अशा स्थितीत मुंबई अनलाॅक करता येऊ शकेल आणि मुंबईची लाईफलाइन लोकल ट्रेनही सुरू करता येईल. फक्त मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) कोरोनाची स्थिती आटोक्यात आली पाहिजे, असं वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केलं आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इक्बालसिंग चहल म्हणाले की, मुंबईतील कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या २ महिन्यांपासून मुंबईत दररोज १ हजार ७०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. मुंबईत मे महिन्यात ६.७ टक्के इतका असलेला कोरोनाबाधित रुग्णांचा दर १ टक्क्यावर आला आहे. तर मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग हा ६४ दिवसांपर्यंत वाढला आहे.

हेही वाचा - मुंबईत दिवसभरात १ हजार ११५ नवे रुग्ण, ५७ जणांचा दिवसभरात मृत्यू 

२० दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला जर दररोज २०० पेक्षा कमी रुग्णालयातील बेड्सची गरज भासत असेल तर स्थितीत पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. त्याकडे पाहता मुंबई अनलॉक करता येऊ शकते, इतर सेवा-सुविधा देखील सुरू करता येऊ शकतात. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठीही सुरू करता येईल, असं इक्बालसिंग चहल यांनी स्पष्ट केलं.

मात्र, चिंतेची बाब म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एमएमआर क्षेत्रातील लोकसंख्या २ कोटी आहे. त्यात उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्यास लोकलमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. कल्याण आणि नालासोपाऱ्यातून प्रवासी मुंबईत ये-जा करतील. परिणामी पुन्हा धोका वाढू शकेल. मुंबई महानगरक्षेत्रात कोरोनावाढीचा दर खाली येऊन मुंबई इतका होईल, तेव्हा प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याचा विचार होऊ शकतो. एमएमआर क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणात आल्यास मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व सेवा सुरू करण्याची शिफारस करेल, असंही इक्बालसिंग चहल म्हणाले.

राज्यात रविवारी कोरोनाने २६७ जणांचा बळी घेतला. असं असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात १११५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा - ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 'इतके' रुग्ण आतापर्यंत बरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा