Advertisement

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 'इतके' रुग्ण आतापर्यंत बरे

वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, 'इतके' रुग्ण आतापर्यंत बरे
SHARES

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. येथील कोरोना रुग्णांचा आकडा ७ हजार ७३२ वर गेला आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रविवारी ५०६ रुग्ण, शनिवारी ५५१ तर शुक्रवारी ५०३ रुग्णांना घरी सोडण्यात आलं  आहे. आतापर्यंत एकूण ११ हजार ५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६६ टक्के आहे. 


ठाणे शहरात धारावीच्या धर्तीवर 'मिशन झिरो' राबवले जात आहे. यामध्ये अँटिजेन चाचण्या करून कोरोना रुग्णांची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले जात आहेत. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मागील १५ दिवसांमध्ये ४५४३ रुग्ण बरे झाले आहेत. १८ जुलै रोजी एकाच दिवशी १२७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १४ जुलै रोजीही ५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.


१५ दिवसात इतके रुग्ण बरे 

२६ जुलै    ५०६

२५ जुलै    ५५१

२४ जुलै    ५०३

२३ जुलै    १३२

२२ जुलै    ६७

२१ जुलै    ६०

२० जुलै    ४२

१९ जुलै    ७८

१८ जुलै    १२७

१७ जुलै    ८७

१६ जुलै    ३४०

१५ जुलै    ५५

१४ जुलै    ५९३

१३ जुलै    १६४

१२ जुलै     ८८



हेही वाचा

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

अनलाॅकनंतर पुन्हा लाॅकडाऊन, पण रुग्णांची संख्या वाढतीच




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा