Advertisement

मुंबईत दिवसभरात १ हजार ११५ नवे रुग्ण, ५७ जणांचा दिवसभरात मृत्यू

रविवारी दिवसभरात १३६१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८० हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत दिवसभरात १ हजार ११५ नवे रुग्ण, ५७ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज कोरोनाने २६७ जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात १११५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-आयपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' तारखेला होणार पहिला सामना

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५७ रुग्ण दगावले आहेत. तर २४ जुलै रोजी ५४ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २५ जुलै रोजी एकूण ५२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १११५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ९०९६ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात १३६१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८० हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण: महेश भट्ट, करण जोहर आणि कंगनाला पोलिस चौकशीला बोलवणार- गृहमंत्री

राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८  हजार ६०१  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ८६ हजार २९६ नमुन्यांपैकी ३ लाख ७५  हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८ हजार ४२० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६३ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ९४३१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६७ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०१ (५७), ठाणे- २१८ (१३), ठाणे मनपा-२९६ (१०), नवी मुंबई मनपा-४०६ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३५८ (९),उल्हासनगर मनपा-७५ (५), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (२), मीरा भाईंदर मनपा-८१४३ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-२२२ (६), रायगड-३०९ (१२), पनवेल मनपा-१८२ (७), नाशिक-१०४ (१), नाशिक मनपा-३१९ (४), मालेगाव मनपा-११, अहमदनगर-१४०, अहमदनगर मनपा-२७५, धुळे-४३ (१), धुळे मनपा-२१ (१), जळगाव-१३० (१३), जळगाव मनपा-२९ (२), नंदूरबार-७ (१), पुणे- ३७५ (१७), पुणे मनपा-१९२१ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-९०० (१०), सोलापूर-१७४, सोलापूर मनपा-१६८ (८), सातारा-१२० (१२), कोल्हापूर-१११ (२), कोल्हापूर मनपा-४३ (१), सांगली-१६, सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (३), सिंधुदूर्ग-७, रत्नागिरी-६२, औरंगाबाद-१०२ (१), औरंगाबाद मनपा-१६१ (८), जालना-४४ (१), हिंगोली-१ (१), परभणी-६ (१), परभणी मनपा-१०, लातूर-३७, लातूर मनपा-१५ (३), उस्मानाबाद-३७ (१), बीड-२६, नांदेड-२९, नांदेड मनपा-४१, अकोला-२४ (१), अकोला मनपा-२१ (१), अमरावती-१ (१), अमरावती मनपा-३६, यवतमाळ-९ (३), बुलढाणा-२५ (३), वाशिम-१६ (१), नागपूर-६८, नागपूर मनपा-११३ (२), वर्धा-१२ (१), भंडारा-२, गोंदिया-७, चंद्रपूर-१९, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-३(इतर राज्य १).

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा