Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाकवच अॅप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'महाकवच अॅप' या डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाकवच अॅप
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'महाकवच अॅप' या डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाकवच अॅप'ची निर्मिती करण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइन ट्रॅकिंग अशी या अॅपची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

 कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का याचे ट्रेसिंग करणे म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या स्मार्टफोनच्या आधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचे ट्रेसिंग करणे या ॲपमुळे शक्य होणार आहे. अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याचे ट्रेसिंगही महाकवच अॅपमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. 

महाकवच अॅपचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग. कोरोना रुग्ण, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा संशयित रुग्ण यांनी किमान 14 दिवस स्वतःचे विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणे अतिशय आवश्यक असते. पण, बऱ्याचदा लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच करोनाचा संसर्ग वाढत जातो. पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच ॲप इनस्टॉल केले जाईल तेव्हा अशा व्यक्तींचे क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स होय. अशा व्यक्तींना एका मर्यादित परिसरातच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा हा परिसर ओलांडला जाईल तेव्हा ॲपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल. यानंतर योग्य ती कार्यवाही प्रशासनातर्फे होणार आहे. या ॲपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो ॲपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागेल.

महाकवच ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप केवळ कोरोना बाधीत, संशयित व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आहे. फक्त अशाच व्यक्ती हे ॲप वापरू शकतात. इतर लोकांना मात्र हे ॲप वापरण्याची परवानगी नसेल. सध्या हा प्लॅटफॉर्म तयार झाला असून नाशिक प्रशासनात त्याचा वापर सुरू आहे. लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लॉन्च करण्यात येईल. 



हेही वाचा -

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा