Advertisement

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका

संपूर्ण मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका बसला आहे.

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं रेल्वे प्रशासनानं संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसंच, भारतीय रेल्वे प्रशासनानं देखील मेल, एक्स्प्रेस बंद केल्या आहेत. कोरोनामुळं पश्चिम रेल्वेची लोकल सेवा १ मार्च ते ३१ मार्च बंद आहे. या एका महिन्यात अनेक प्रवाशांनी लांब पल्ल्याचं तिकीट रद्द केलं आहे. तर २२ मार्चपासून लोकल बंद आहे. त्यामुळं संपूर्ण मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका बसला आहे. 

पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या प्रवासी वाहतुकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूल सुद्धा बुडत आहे. २२ मार्च या एका दिवशी ७९ कोटी रुपयांचं सर्वाधिक नुकसान झालं. त्यानंतर २४ मार्चपर्यंत १०७ कोटी, २६ मार्च पर्यंत १३५ कोटी ६६ लाख रुपये, २८ मार्च पर्यंत १६३ कोटी  रुपयांचं उत्पन्न बुडालं आहे. तर, १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत २०७ कोटी ११ लाखांचा फटका बसला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, कोलकता मेट्रो ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळं २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. परिणामी, १४ एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार आहेत. त्यामुळं भारतीय रेल्वेलाही याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ

सीबीएसईच्या १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात थेट प्रवेशRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा