Advertisement

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजुंना मदत केली आहे.

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ
SHARES

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजुंना मदत केली आहे. कोलकात्यातील गरजू व्यक्तीसांठी २ हजार किलो तांदूळ दान केले आहेत. कोलकात्यातील बेलूर मठ परिसरात जाऊन सौरवनं ही मदत केली आहे. याबाबत सौरव गांगुलीने आपल्या या मदतकार्याचे फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत आमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा असेल, तर सकरानं आम्हाला सांगावं. जे जे गरजेचं आहे ते आम्ही करु, कोणतीही समस्या येणार नाही, अशा शब्दांमध्ये गांगुलीनं आपण या खडतर काळात सरकारच्यासोबत असल्याचं सांगितलं. सौरवने काही दिवसांपूर्वी ५० लाख किमतीचे तांदूळ गरजू व्यक्तींमध्ये दान करण्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे गांगुलीप्रमाणे सध्याच्या काळात ज्या नागरिकांना मदत करणं शक्य आहे त्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने परिपत्रक जाहीर करत केलं आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत परदेशातील नागरिकांना भारतात येण्यासाठी बंदी केली होती. या भयंकर व्हायरसचा फटका बीसीसीआयलाही बसला आहे. आयपीएलचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय, सर्व संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा -

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून मास्कची निर्मिती

राज्यात लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्या 8 हजार जणांवर गुन्हे दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा