Advertisement

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून मास्कची निर्मिती

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या परिसरातील सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत.

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून मास्कची निर्मिती
SHARES

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या परिसरातील सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत. या मास्कसाठी रोजच्या वापरातील घरातील वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. तसंच, आयआयटी बॉम्बेच्या इंडस्ट्रियल स्कूल ऑफ डिझाइन विभागातील (आयडीसी) प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मास्क तयार केले आहेत.

कोरोनामुळं मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढल्यानं बाजारात त्याचा काही वेळा तुटवडा जाणवतो. त्याचप्रमाणे उपलब्ध मास्कमध्ये अनेक त्रुटी असल्याचंही समोर आलं आहे. त्या त्रुटी दूर करून आयडीसीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मास्क तयार केले आहेत. 

या मास्कमुळे व्यक्तीच्या डोळ्याच्या खालच्या भागापासून हनुवटीपर्यंतचा भाग झाकला जातो. यामुळे यात संबंधित व्यक्तीला संपूर्ण सुरक्षा मिळणे शक्य होणार आहे. येत्या काळात असे हजार मास्क तयार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आयआयटी बॉम्बेतील प्राध्यापक अंबरीश कुंवर, प्रा. कुमारेसन आणि प्रा. पूर्बा जोशी यांनी सॅनिटायझर तयार करणारी २ यंत्रे निर्माण केली आहेत. 

स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली ही यंत्रे आकारानं लहान आहेत. त्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर काही रसायनांचं मिश्रण करून सॅनिटायझर तयार करता येऊ शकतं. प्राध्यापकांच्या या गटानं अवघ्या ४ तासांत या यंत्रांची निर्मिती केली आहे.



हेही वाचा -

शाळेतील शिल्लक धान्य विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार

Coronavirus : मुंबईत १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, २४ तासात सापडले ३० रुग्ण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा