coronavirus : मुंबईत १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, २४ तासात सापडले ३० रुग्ण

महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली आहे.

coronavirus : मुंबईत १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, २४ तासात सापडले ३० रुग्ण
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईतून १६ रुग्ण आढळले होते. आता त्यात आणखी भर पडली आहे ते म्हणजे १४ रुग्णांची. मुंबईत एका दिवसात ३० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. अवघ्या १२ तासांमध्ये मुंबईमध्ये ३० नवे रुग्ण समोर आले आहेत.

महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली आहे. १४ रुग्ण मुंबईत तर १ रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्यानं ३२० वरुन रुग्ण संख्या थेट ३३५ वर गेली आहे. करोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. देशातली करोनाग्रस्तांची संख्या १६०० च्या वर गेली आहे. यामधले सर्वाधिक ३३५ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

खासगी लॅबनं चाचणी निकाल जाहीर केल्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्ण समोर येत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील 10 खासगी प्रयोगशाळांना चाचणीसाठी नमुने गोळा करणं थांबवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी चिठ्ठी पाठवली आहे. या लॅबमध्ये पुरेसे चाचणी किट्स नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला. पुणेस्थित मायलाब सध्या किटचा पुरवठा करीत आहे. मात्र, त्यांना मागणी पूर्ण करता येत नाही आहे.

राज्य सरकार आणि पालिका अधिकारी या परिस्थितीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मुंबईतील अनेक परिसर आधीच सील करण्यात आली आहेत. नुकत्याच जाहीर केलेल्या निवेदनात असं म्हटलं होतं की, मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील १६६ भागांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यापैकी ४६ भाग पश्चिम मुंबईतील आणि ४८ मध्य आणि दक्षिण मुंबईतील आहेत.
संबंधित विषय