Advertisement

सीबीएसईच्या १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात थेट प्रवेश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीएसईच्या १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात थेट प्रवेश
SHARES

देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊननंतर देशातील सर्व शैक्षणिक मंडळांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याचप्राणं आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं आदेश दिले आहेत. त्यामुळं सीबीएसई शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळाला आहे. 

देशातील लॉकडाऊन सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत होतं. त्यामुळं राज्यातील शिक्षण मंडळांनी सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळं देशभरात १४ एप्रिलपर्यंत शाळा सुरू होणं शक्यच नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. याचदरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे सुचविलं. यानंतर सीबीएसईनं एनसीईआरटीशी चर्चा करून हा निर्णय घेतला. 

देशातील बहुतांश शाळांमध्ये इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. परंतु, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालये तसेच काही राज्यांतील खासगी सीबीएसई शाळांमध्ये नववी व अकरावीच्या परीक्षा बाकी आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीनुसार त्यांचे मुल्यांकन करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सीबीएसईच्या दहावी व बारावीची ज्या विषयांची परीक्षा बाकी आहे त्याचे वेळापत्रक तयार करणे सद्यस्थितीत अवघड आहे. मात्र या विद्यार्थ्यांचा भवितव्याचा विचार करत त्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेत त्यापूर्वी ही परीक्षा घेण्यात येईल. यासाठी परीक्षेच्या किमान १० दिवस आधी सर्वांना कळविण्यात येणार असल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केले आहे.



हेही वाचा -

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून मास्कची निर्मिती

मनसेच्या माजी आमदाराची कोरोनाग्रस्तांना १० लाखांची मदत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा