Advertisement

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आता देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बँक बनली आहे.

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक
SHARES

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आता देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बँक बनली आहे. युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बूँकांचं पीएनबीमध्ये विलीनीकरण झालं आहे.  या दोन्ही बँकांच्या शाखा बुधवारपासून पीएनबीच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या आहेत. या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण बुधवारी पूर्ण झाले. 

तिन्ही बँकांच्या एकत्रीकरणानंतर पीएनबी २.० या रूपात एक अत्याधुनिक आणि आजच्या काळाची बँक म्हणून उदयाला आली असल्याचा दावा बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे. पीएनबी २.० स्वरूपातील बँकेने नव्या शाखांसह सर्व शाखांतून आंतर-कामकाजासाठी अद्ययावत सेवा दिली आहे. यामध्ये मोबाइल व इंटरनेट बँकिंग यांचाही समावेश आहे.

एकत्रीकरणानंतर नवीन पीएनबी बँकेच्या ११ हजारहून अधिक शाखा असतील. तसंच आता पीएनबीचे १३ हजारहून अधिक एटीएम झाले आहेत. बँकेकडे आता एक लाख कर्मचारी झाले आहेत. तर बँकेचा एकूण  व्यवसाय १८ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. बँकेचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून यामुळे ग्राहकांना प्रभावीरीत्या सेवा देणे शक्य होणार असल्याचे पंजाब नॅशनल बँकेचे एमडी व सीईओ एस. एस. मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले आहे.



हेही वाचा -

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा