Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रस्त्यावर पेंटींग

कोरोनाचा प्रदुर्भाव जास्त असल्यानं नागरिकांमध्ये गांभिर्य निर्माण व्हाव यासाठी मुंबई पोलीस, स्थानिक मंडळी, संस्थान अनेक जनजागृती करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रस्त्यावर पेंटींग
SHARES

मुंबईतील महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाला कोरोना व्हायरसनं चांगलंच घेरलं आहे. या भागातील एकट्या वरळी परिसरात मुंबईतील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथील अनेक परिसर प्रतिबंधित करण्यात आले असून, नागरिकांना सतत पोलिसांच्या मार्फत सुचना देण्यात येत आहेत. अशातच या परिसरात कोरोनाचा प्रदुर्भाव जास्त असल्यानं नागरिकांमध्ये गांभिर्य निर्माण व्हाव यासाठी मुंबई पोलीस, स्थानिक मंडळी, संस्थान अनेक जनजागृती करत आहेत. सोशल मीडियावर या व्हायरसचं गांभिर्य लक्षात घ्याव असे मेसेजेस पाठविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणं रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये गांभइर्य निर्माण व्हाव यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

जी/दक्षिण विभागातील जितके कंटेन्मेंट परिसर आहेत, त्या सर्व १८ झोनच्या रस्त्यावर जी/द विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यामार्फत प्रबोधन पर पेंटिग काढण्यात येत आहे. कोरोनाचा विषाणू दर्शवणारे अनेक चित्र काढण्यात आले असून, त्या चित्राला संबोधून विचारही लिहिले आहेत. चला तर पाहूयात...







संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा