Advertisement

Prakash Ambedkar: कोरोना हे तर सरकारचं नाटक, प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट

कोरोना म्हणजे राज्य सरकारचं नाटक आहे. सरकारला निवडणुका घ्यायच्या नाहीत, म्हणून ते खोटं बोलत आहेत. त्यांना आपलंच राज्य चालवायचं आहे. त्याची सुरूवात ग्रामपंचायतीपासून करत आहे. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar: कोरोना हे तर सरकारचं नाटक, प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट
SHARES

कोरोना म्हणजे राज्य सरकारचं नाटक आहे. सरकारला निवडणुका घ्यायच्या नाहीत, म्हणून ते खोटं बोलत आहेत. त्यांना आपलंच राज्य चालवायचं आहे. त्याची सुरूवात ग्रामपंचायतीपासून करत आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास विरोध केला. या मागणीसाठी आंबेडकर व पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांनी यांनी शुक्रवार १७ जुलै रोजी दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं जाऊन भेट देखील घेतली. (VBA chief prakash ambedkar opposed to appoint administrator on maharashtra gram panchayat

ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे, अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. परंतु हे घटनाबाह्य असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. प्रशासक नेमायला आमचा विरोध असून निवडणूक घेता येत नसतील तर आहे त्या ग्रामपंचायतीलाच ६ महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांकडे केली.

हेही वाचा - Reservation: भाजप वा काँग्रेसमध्ये राजकीय आरक्षण बंद करण्याची हिंमत नाही- प्रकाश आंबेडकर


राज्यात मुदत संपत आलेल्या अनेक ग्रामपंचायती असून काही ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. अशा ठिकाणी प्रशासक नेमण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. मात्र या अध्यादेशाचा गैरफायदा घेण्यात येत असून राष्ट्रवादी पक्षाने आपली दुकाने मांडली आहे. ज्यांना प्रशासक म्हणून अर्ज करायला सांगितलं आहे, त्यांना ११ हजार रुपयांची पावती अर्जासोबत जोडायची आहे शिवाय प्रशासक म्हणून निवड न झाल्यास हे ११ हजार रुपये परत मिळणार नाही असंही राष्ट्रवादीने सांगितलं आहे.

मुळात भारतीय घटनेच्या दृष्टीने पाहिलं, तर ज्या प्रशासकीय व्यक्तीने घटनेची शपथ घेतली आहे अशाच व्यक्तीला प्रशासक म्हणून  नेमण्याचा अधिकार आहे. मात्र कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचा अधिकार नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांना सांगितलं. त्याच बरोबर निवडणुका तात्काळ घेता येत नसेल तर आहे त्या ग्रामपंचायतीलाच ६ महिन्यांची मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा