Advertisement

प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे मी काय महाराष्ट्र पण लक्ष देत नाही- निलेश राणे

एरवी निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही, पण त्यांनी जो शब्द वापरला तो मागे घ्यावा आणि तृतीय पंथीयांची माफी मागावी अशी मागणी करणारे प्रकाश आंबेडकर यांना निलेश राणे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे मी काय महाराष्ट्र पण लक्ष देत नाही- निलेश राणे
SHARES

सोशल मीडियावरील वादावादीत माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (prajakta tanpure) यांचा चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात सध्या या वादाचीच चर्चा सुरू आहे. परंतु तृतीय पंथी समुदायाने निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (vba chief prakash ambedkar) यांनी एरवी निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही, पण त्यांनी जो शब्द वापरला तो मागे घ्यावा आणि तृतीय पंथीयांची माफी मागावी अशी मागणी केली. त्याला निलेश राणे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

तनपुरेंना अपशब्द

भाजप नेते निलेश राणे (bjp leader prakash ambedkar) आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात सोशल मीडियावर झालेल्या वादावादीत राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून कोणीतरी ‘हिजडा' राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले. समोर आले की पिवळी होते साल्यांची. जा सांग तनपुरे येतो मी, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत राणेंविरोधात येथील फैजपूर इथं भादंवि कलम ४९९ आणि ५०१ अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - एरवी निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही, पण... प्रकाश आंबेडकरांनी सुनावले खडेबोल

काय म्हणाले होते आंबेडकर?

त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारलं पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावं. एरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही. पण, त्यांनी जो शब्द वापरला आहे, तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली.

राणेंचं प्रतिउत्तर

त्याला निलेश राणेंनी प्रतिउत्तर दिलं. ते म्हणाले की, एरवी प्रकाश आंबेडकर काय बोलतात मी काय महाराष्ट्र पण लक्ष देत नाही पण साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो आपण २०१९ दोन ठिकाणी लोकसभेला उभे होतात आणि मी १ ठिकाणी तरी तुम्ही दोन्ही मतदारसंघात दीड/पावणे २ लाख मतं घेतली आणि मी एकाच मतदार संघात २ लाख ७८ हजार मतं घेतली. माहितीसाठी सांगितलं.

हेही वाचा - 'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर..., तृतीयपंथीयानं निलेश राणेंना सुनावलं


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा