Advertisement

एरवी निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही, पण... प्रकाश आंबेडकरांनी सुनावले खडेबोल

तृतीय पंथीयांना अशा पद्धतीने हिणवणं गैर असून राणे यांनी याप्रकरणी माफी मागावी, असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

एरवी निलेश राणेंची दखल घेण्याची गरज नाही, पण... प्रकाश आंबेडकरांनी सुनावले खडेबोल
SHARES

सोशल मीडियावरील वादावादीत माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात सध्या या वादाचीच चर्चा सुरू आहे. परंतु तृतीय पंथी समुदायाने निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील या वादात उडी घेत राणेंना खडेबोल सुनावले आहेत. एवढंच नाही, तर तृतीय पंथीयांना अशा पद्धतीने हिणवणं गैर असून राणे यांनी याप्रकरणी माफी मागावी, असं देखील आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

मागील काही दिवसांपासून निलेश राणे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात सोशल मीडियावर राजकीय वाद सुरू आहे. त्यातच राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून कोणीतरी ‘हिजडा' राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले. समोर आले की पिवळी होते साल्यांची. जा सांग तनपुरे येतो मी, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात जळगाव येथील फैजपूर इथं भादंवि कलम ४९९ आणि ५०१ अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - 'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर..., तृतीयपंथीयानं निलेश राणेंना सुनावलं

त्यापाठोपाठ मी तनपुरेला हिजडा बोललो हे तृतीयपंथीयांना वाईट वाटलं. त्यांचं म्हणणं असावं की आमचं समजामध्ये मानाचं स्थान आहे. म्हणून तनपुरे सारख्या खरूज कुत्र्याला आमच्याशी जोडू नका, ते बरोबर आहे. पण राष्ट्रवादी पक्षाला तृतीयपंथीयांचा आसरा घ्यावा लागतोय ह्याचं नवल वाटतं. मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही... पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच न्हवता. NCP वाल्यांना मी फाट्यावर मारतच राहणार, असे ट्विटही निलेश राणे यांनी केले.

गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं

त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारलं पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावं. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही. पण, त्यांनी जो शब्द वापरला आहे, तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी. निलेश राणेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे आहोत!


असं म्हणत निलेश राणे यांनी तृतीय पंथीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा