Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

लज्जास्पद! कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा जगातला एकमेव पक्ष, आदित्य ठाकरेंनी भाजपला सुनावलं

राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांनी कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचं म्हटलं आहे.

लज्जास्पद! कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा जगातला एकमेव पक्ष, आदित्य ठाकरेंनी भाजपला सुनावलं
SHARES

कोरोनाची परिस्थिती (coronavirus) हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (mahavikas aghadi government) सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, भाजपने (bjp protest) सरकारविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनावर टीका करताना राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांनी कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचं म्हटलं आहे.

जागतिक विक्रम

कोरोना संकटाच्या (covid-19 pendamic) काळात जगभरातील लोकं आपापसातील भेदभाव, द्वेष विसरून एकमेकांच्या हातात हात घालून या संकटाशी मुकाबला करत असताना महाराष्ट्रातील एक पक्ष मात्र समाजात भीती पसरवून राजकारण करत आहे. जगावर आपत्ती आल्याचं विसरून या परिस्थितीतही केवळ राजकारण करणारा हा जगातील एकमेव पक्ष आहे. यातून या पक्षाने आपली पातळी किती घसरलीय याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.

हेही वाचा - शासन निष्क्रीय, जनता किती सहन करणार?- देवेंद्र फडणवीस

एवढंच नाही, तर आंदोलन करण्यासाठी या पक्षातील नेत्यांनी लहान मुलांनाही सोडलेलं नाही. सध्याच्या स्थितीत लहान मुलांना घरात सुरक्षित ठेवण्याची गरज असताना, या राजकारण्यांनी भर उन्हात तोंडावरचं मास्क खाली खेचून या मुलांच्या हाती बॅनर सोपवले आहेत. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शासन निष्क्रीय   

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून शासन निष्क्रीय झालं आहे. या संकटाच्या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजपने सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली, परंतु महाविकास आघाडी सरकार विश्वासात न घेताच चुकीचे निर्णय घेत सुटलं आहे. यामुळे जनता तरी आता किती सहन करणार? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला जागं करण्यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारण्यात आल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एवढंच नाही, तर लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी, १२ बलुतेदार आणि असंघटीत कामगारांना ५० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषण सरकारने करावी, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - ‘हे’ आंदोलन तर मोदींनासुद्धा पटणार नाही- जयंत पाटील

 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा