Advertisement

मुंबईत आतापर्यंत 'इतके' कोरोना रुग्ण झाले बरे

मुंबईमध्ये रुग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन तो १.०९ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत आतापर्यंत 'इतके' कोरोना रुग्ण झाले बरे
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ९ हजारांवर गेली आहे. दिवसेेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. मात्र, मुंबईतील तब्बल ८० हजार २३८ रुग्ण बरे झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ६७ दिवसांवर गेला आहे.


मुंबईमध्ये रुग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन तो १.०९ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे रोज हजारांच्या घरात रुग्ण आढळत असले तरी कोरोना नियंत्रणात असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्क्यांवर पोहोचले आहे. रविवारी एक हजार ३६१ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. सध्या २२ हजार ७६८ रुग्णांवर उपचार सुरू आङेत. 


कोरोनाच्या चाचण्या अधिक जलदगतीने करता याव्यात यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनची अट रद्द करण्यात आली असून संशयीतांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे रोज होणाऱ्या चाचण्यांमध्ये २८०० चाचण्यांची भर पडली असून रोज ६८०० चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचं दिसत असलं तरी प्रभावी क्वारंटाईन आणि औषधोपचारामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी रोज वाढत आहे. 



हेही वाचा

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

अनलाॅकनंतर पुन्हा लाॅकडाऊन, पण रुग्णांची संख्या वाढतीच




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा