Advertisement

रॅपिड टेस्टिंगसाठी दक्षिण कोरियामधून 1 लाख किट्स

मुंबईत कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच कोरोनाची रॅपिड टेस्टिंग होणार आहे.

रॅपिड टेस्टिंगसाठी दक्षिण कोरियामधून 1 लाख किट्स
SHARES

मुंबईत कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच कोरोनाची रॅपिड टेस्टिंग होणार आहे.  रॅपिड टेस्टिंगसाठी मुंबई महापालिका दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स विकत घेणार आहे. ते किट्स आले की रॅपिड टेस्टिंगला सुरुवात होईल. रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे का याची तात्काळ माहिती मिळते. तसं इन्फेक्शन झालं असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.

राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी आता एका पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने ज्याप्रमाणे आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासतो त्याचप्रमाणे ही तपासणी केली जाईल. त्यानंतर संबंधितास कोरोनाची पुढील तपासणी करण्याची किंवा आयसोलेशन किंवा क्वारंटाईन करण्याची गरज आहे की नाही, हे देखील स्पष्ट होईल.

कोरोनाच्या सध्याच्या चाचणीसाठी नाक आणि घशातील स्वॅब गरजेचे आहेत. त्याचा रिझल्ट येण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. मात्र,  रॅपिड टेस्टमध्ये केवळ 15 मिनिटात रिझल्ट येतो. या टेस्टमध्ये फक्त रक्ताचे नमुने तपासावे लागतात. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा यासह इतर राज्यांनी रॅपिड अँटी बॉडी टेस्टसाठी ICMR कडे परवानगी मागितली होती.

 वरळी, धारावी, पुणे, सांगली यासारख्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण जास्त आहे. तिथं टेस्टिंगचं प्रमाण वाढलं तर ज्यांना कोरोनाची लागण आहे, मात्र लक्षणं दिसत नाहीत अशा रुग्णांना शोधणं सोपं जाईल. कम्युनिटी स्प्रेडिंग रोखण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट असेल. जिथं कोरोनाचा धोका अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये ही किट्स पाठवली जातील.



हेही वाचा -

Coronavirus Updates: दक्षिण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २५० वर

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा